आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाकिस्तानने नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी परस्परांना दिली आण्विक ठिकाणांची यादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारत आणि पाकिस्तानने नूतन वर्षाच्या पहिल्याच दिवशी परस्परांना आपल्या अणुसंस्थांची यादी सोपवली. अशा प्रकारचे आदान-प्रदान करण्याचे उभय देशांचे हे २६ वे वर्ष आहे. यादीतील ठिकाणांवर हल्ला केला जाऊ शकत नाही, हा यादीचा आदान-प्रदान करण्यामागील मुख्य उद्देश आहे. 
 
यादीची देवाण-घेवाण मुत्सद्दींच्या पातळीवर इस्लामाबाद व दिल्लीत झाले. आदान-प्रदान संबंधीचा करार ३१ डिसेंबर १९८८ मध्ये झाला होता आणि २७ जानेवारी १९९१ पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली होती. दोन्ही देश परस्परांना अाण्विक संस्थांची यादी देतात. त्याशिवाय दोन्ही देश आपापल्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादीही सोपवतात. त्यात मासेमारांचाही समावेश आहे. जेणेकरून कैद्यांना राजदूताची मदत मिळावी. त्यासंबंधीचा करार २००८ मध्ये झाला होता. अशी यादी दरवर्षी एक जानेवारी आणि १ जुलै रोजी दिली जाते. दुसरीकडे मात्र पाकिस्तानने कुलभूषण जाधवला राजदूताची मदत दिली नाही. तो सामान्य नागरिक नसून रॉचा हेर आहे, असा आरोप करण्यात आला आहे. तो नौदलाचा माजी अधिकारी आहे. आता त्याचा सेनेशी काहीही संबंध नाही.  

६६ भारतीय मच्छीमार पाकिस्तानच्या तुरुंगात
कराची-
कराचीमधील एका न्यायालयाने ६६ भारतीय मच्छीमारांची शनिवारी तुरुंगात रवानगी केली. पाकिस्तानच्या सागरी क्षेत्रात घुसखोरी केल्याचा ठपका त्यांच्यावर आहे. शुक्रवारी त्यांना अटक झाली होती. मासेमारांच्या पाच  बोटींनादेखील ताब्यात घेण्यात आले आहे. दोन्ही देश आपल्या हद्दीत बेकायदा घुसखोरी करणाऱ्या मच्छीमारांना अटक करण्याची कारवाई करतात. २५ डिसेंबर रोजी पाकिस्तानने सद््भावनेपोटी २२० भारतीय मच्छीमारांची सुटका केली होती.  
बातम्या आणखी आहेत...