आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस बँकेत भारतीयांचा अपेक्षेपेक्षा कमी पैसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली - सिंगापूर व हाँगकाँगसारख्या अन्य जागतिक आर्थिक केंद्रांच्या तुलनेत भारतीयांचा स्विस बँकेत कमी पैसा असल्याचे स्वित्झर्लंडमधील खासगी बँकांच्या गटाने म्हटले आहे. भारतीयांचे स्विस बँकेत १.२ अब्ज फ्रँक(सुमारे ८,३९२ कोटी रु.) जमा आहेत. असे असले तरी अन्य जागतिक वित्त संस्थांत भारतीयांचा किती पैसा आहे याविषयी अधिकृत माहिती उपलब्ध नाही.

स्वित्झर्लंडने गेल्या आठवड्यात भारतासह ४० देशांना त्या देशातील नागरिकांकडून जमा पैशाची माहिती अाॅटोमेटिक एक्सचेंज ऑफ टॅक्स इंन्फर्मेशनद्वारे देण्यास मंजुरी दिली आहे. एईओआयमध्ये माहितीबाबत गोपनीयता अपेक्षित आहे. मात्र, भारतातील कायदा पाहता चिंतेचे कारण नसल्याचे जिनिव्हास्थित असोसिएशन ऑफ स्विस बँक्सने म्हटले आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगच्या तुलनेत भारतीयांचा खूप कमी पैसा असल्याचे असोसिएशनचे व्यवस्थापक जॅन लांगलो यांनी सांगितले.
 
नव्या प्रणालीद्वारे स्विस बँक खात्याची माहिती मिळाल्यानंतर भारताने त्याबाबत गोपनीयता बाळगणे अत्यावश्यक आहे. तसे न झाल्यास संबंधित देश माहिती देणे थांबवतील,असे या बँकांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...