आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अायपीएल अडचणीत; 2500 काेटींच्या नुकसानीची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सर्वाेच्च न्यायालयाकडून स्थापन करण्यात अालेल्या व्यवस्थापन समिती व राज्य क्रिकेट संघटनेच्या वादामुळे अाता दहाव्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा अडचणीत सापडण्याचे चित्र अाहे. यातून भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला तब्बल २५०० काेटींचा फटका बसण्याची शक्यता मंडळाच्या एका अधिकाऱ्याने वर्तवली. येत्या ५ एप्रिलपासून अायपीएलला सुरुवात हाेणार अाहे.   

लाेढा समितीच्या शिफारशी लागू न करणाऱ्या राज्य संघटनांना बीसीसीअायकडून काेणत्याही प्रकारचा अार्थिक फंड मिळणार नसल्याचे सर्वाेच्च न्यायालयाने स्पष्ट केले. त्यामुळेच अाता बीसीसीअायला अायपीएलचे अायाेजन करणे अाव्हानात्मक अाहे. कारण यातील प्रत्येक सामन्यांच्या अायाेजनासाठी बीसीसीअाय माेठा निधी राज्य संघटनांना देते. मात्र, अाता सर्वाेच्च न्यायालयाच्या अादेशामुळे अडचण निर्माण झाली अाहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...