आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागा बंडखोर-सरकार दरम्यान करार, शांततेचे नवे नाते

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, औरंगाबाद- केंद्र सरकार आणि नॅशनल सोशल कौन्सिल ऑफ नागालँड (एनएससीएन-मुईवा) यांच्यात सोमवारी शांतता करार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या या करारावर गृहमंत्री राजनाथसिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या उपस्थितीत संघटनेचे नेते थुइंगालेंग मुईवा यांनी स्वाक्षरी केली.

एनएससीएनमध्ये फूट, केंद्राच्या पथ्यावर
नोव्हेंबर १९७५ मध्ये एनएनसीने शिलाँग समझोत्यानुसार शस्त्र खाली ठेवले. मात्र थुइंगालेंग मुईवाच्या नेतृत्वाखालील १४० जणांच्या गटाने शिलाँग समझोत्याला विरोध दर्शवत बंड पुकारले. त्यांनी १९८० मध्ये एनएससीएनची स्थापना केली. यात इसाक चिसी सुवू आणि एस.एस. खापलांग मुईवाबरोबर होते. १९८८ मध्ये खापलांग बाहेर पडले. एनएससीएन-खापलांग व एनएससीएन-मुईवा असे गट झाले.
मुईवाना का हवी शांतता ?
मईवा, सुवू आणि एनएससीएन-मुईवाचे अनेक बंडखोर नेते १९९० मध्ये थायलंडमध्ये गेले. त्यानंतर प्रत्येक सरकारने शांततेसाठी बोलणी केली. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी गेले. नागालँड व केंद्रात सत्तांतर झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घेत एनएससीएन-मुईवाशी शांतता करार केला. या कराराने ईशान्येकडील राज्यांत शांतता राखण्यात मदत होईल.

नेमकी मागणी काय
बंडखोरांना ग्रेटर नागलिंगम हवे आहे. यात सर्व नागा जमातीचा समावेश राहील. सध्याच्या नागालँड राज्यासह, आसाम, अरुणाचल प्रदेश व मणिपूरमधील काही जिल्ह्यांचा ग्रेटर नागलिंगममध्ये समावेश आहे. मात्र नागालँड विधीमंडळाने १९६४ ते २०१५ या काळात ग्रेटर नागलिंगमची मागणी पाच वेळा फेटाळली आहे. ग्रेटर नागलिंगम सुमारे १,२०,००० चौरस किमीचे आहे. नागालँड १६,५२७ चौरस किमी आहे.

नागालँड निर्मिती
आसामचे तेव्हाचे राज्यपाल सर अकबर हैदरी यांनी २९ जून १९४७ रोजी नऊ कलमी करार केला. फिजोने काढून टाकलेले टी. साखरई व अलिबा ईम्टी यांनी या करारावर स्वाक्षरी केली. त्यानंतर १९६३ मध्ये नागा हिल्स या आसाममधील जिल्ह्याचे नागालँड राज्य बनले.
जेपींचे प्रयत्न
त्या काळात जयप्रकाश नारायण, आसामचे मुख्यमंत्री बिमला प्रसाद छलिया व रेव्हरंड मायकेल स्कॉट यांनी शांतता मोहीम राबवली. त्यांनी सरकार व एनएनसी यांच्यात बोलणी घडवून आणली. चर्चेच्या सहा फेऱ्यानंतरही तोडगा निघाला नाही. १९६७ मध्ये शांतता मोहिमेला गालबोट लागले.

खापलांग यांचे आव्हान कायम :
शांतता करार झाला असला तरी दुसऱ्या गटाचे प्रमुख एस.खापलांग यांचे आव्हान कायम आहे. दोन महिन्यांपूर्वी मणिपूर येथे लष्करावर झालेल्या हल्ल्याचा खरा सूत्रधार खापलांग असल्याचे मानले जाते. यात आठ जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय लष्कराने म्यानमारच्या हद्दीत घुसून अनेक बंडखोरांना कंठस्नान घातले.

काय आहे समस्या
-१८८१ब्रिटिशांशी नागा बंडखोरांचा पाडाव करत नागा टेकड्यांवर अंमल सुरू केला.
-१९२९सायमन कमिशनसमोर नागांची स्वतंत्र राष्ट्राची मागणी. याचसाठी अन्गामी झापू फिजो यांनी नागा नॅशनल कौन्सिलची (एनएनसी) स्थापना केली.
-१४ ऑगस्ट १९४७स्वतंत्र व सार्वभौम नागालँड घोषित.
-१९५१सार्वमत घेतले. त्यात ९९% मते सार्वभौम नागालँडच्या बाजूने असल्याचे घोषित. भारत सरकारचा विरोध.
बातम्या आणखी आहेत...