आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जदयूतील महाभारत; यादव यांचा गट उच्च न्यायालयात; ‘बाण’ निवडणूक चिन्हाची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- ‘बाण’ या निवडणूक चिन्हावरील दावा फेटाळण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला संयुक्त जनता दलाच्या (जेडीयू) शरद यादव गटाचे नवनियुक्त अध्यक्ष के. राजशेखरन यांनी बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले. याप्रकरणी गुरुवारी सुनावणी होणार आहे.


निवडणूक आयोगाने १७  नोव्हेंबर रोजी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या नेतृत्वाखालील गटाला अधिकृत मान्यता देऊन त्या गटाला ‘बाण’ हे चिन्ह दिले होते. त्यासाठीची कारणे आयोगाने नमूद केली नव्हती. शरद यादव यांच्या गटाने या आदेशाविरुद्धही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आयोगाने २५ नोव्हेंबरला निर्णयाची कारणे देणारा आदेश दिला होता. आयोगाच्या या आदेशाला राजशेखरन यांनी आव्हान दिले आहे.


आयोगाच्या १७ नोव्हेंबरच्या आदेशाला यादव गटाचे तत्कालीन प्रभारी अध्यक्ष छोटूभाई वसावा यांनी आव्हान दिले होते. वसावा यांच्या वकिलाने न्यायालयात सांगितले होते की, गुजरात निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत उलटून गेली असून दुसऱ्या टप्प्याची प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण होईल. त्यामुळे गुजरात निवडणुकीसाठी कोणी निवडणूक चिन्हाचा वापर करावा याबाबत विचार व्हावा. दुसरीकडे, निवडणूक आयोगाने आमच्या बाजूने निर्णय दिला असल्याने आमच्या उमेदवारांनी याआधीच ‘बाण’ या निवडणूक चिन्हासह उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, असे नितीश यांच्या गटाने सांगितले होते.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, काय म्‍हणाले व्यंकय्या नायडू आणि अरविंद केजरीवाल...

बातम्या आणखी आहेत...