आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलक विद्यार्थ्यांवर कारवाईसाठी हवे पोलिस, जेएनयूची दिल्ली उच्च न्यायालयात मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 नवी दिल्ली  - जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या (जेएनयू) प्रशासकीय ब्लॉकमध्ये निदर्शने करत असलेल्या विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यासाठी विद्यापीठाने पोलिसांची मागणी केली आहे. दिल्ली उच्च न्यायालयात न्यायमूर्ती व्ही. के. राव यांच्या न्यायालयात सुनावणीदरम्यान जेएनयूतर्फे ही माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हेही दाखल करण्यात आले, असेही विद्यापीठातर्फे सांगण्यात आले. खटल्यात विद्यार्थ्यांना प्रतिवादी करता यावे म्हणून न्यायालयाने जेएनयूकडून विद्यार्थ्यांची नावे मागितली आहेत.  
 
दिल्ली उच्च न्यायालयात काही विद्यार्थ्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. प्रशासकीय ब्लाॅकसमोर निदर्शने केल्यामुळे आमची प्रमाणपत्रे मिळत नाहीत, असे विद्यार्थ्यांनी याचिकेत म्हटले आहे. नोकरी आणि शिक्षणासाठी अर्ज करता यावा म्हणून प्रमाणपत्र द्यावे, अशी विनंती विद्यार्थ्यांनी केली आहे. त्यावर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यासाठी आम्हाला पोलिस दल देण्यात यावे, अशी मागणी जेएनयूतर्फे करण्यात आली. 
 
वकिलाने सांगितले की, आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची दहशत विद्यापीठातील अधिकाऱ्यांमध्ये आहे. न्यायालयाने त्यावर कुठलेही निर्देश देण्यास नकार दिला. जेएनयूने स्वत: काही व्यवस्था करावी, न्यायालयाने काही दिशानिर्देश जारी केले तर भविष्यात विद्यार्थी आपल्या समस्या घेऊन न्यायालयात पोहोचतील, अशी टिप्पणी न्यायालयाने केली. 
 
बातम्या आणखी आहेत...