आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्मसंरक्षणासाठी हत्या, आरोपी सुरेश सिंघल एका खून प्रकरणातून निर्दोष मुक्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- २६ वर्षांपूर्वी दुहेरी हत्याकांडात साडेतेरा वर्षांपासून तुरुंगवास भाेगत असलेला आरोपी सुरेश सिंघल यास एका खून प्रकरणातून सर्वोच्च न्यायालयाने निर्दोष मुक्त केले, तर दुसऱ्या खुनात सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली दोषी ठरवले आणि भोगलेली सजा पुरेशी असल्याचे सांगत त्याच्या सुटकेचे आदेश दिले. 
 
न्या. एस. ए. बोबडे आणि न्या. एल. नागेश्वर राव यांच्या पीठाने या निर्णयावर टिप्पणी करताना म्हटले : भारतीय कायद्यानुसार जेव्हा एखाद्या व्यक्तीचा जीव धोक्यात असेल तर त्याच्याकडे आत्मसंरक्षणाचा अधिकार उरतो. अशा परिस्थितीत अपरिहार्य अवस्थेत त्याच्याकडून ठार मारण्याच्या उद्देशाने आलेल्या हल्लेखाेरांची हत्या होत असेल तर त्याला दोषी मानता येणार नाही, पण हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून असते. खरोखरच त्याचा जीव धोक्यात होता, हे सिद्ध करणे अत्यावश्यक आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाने सिंघल याने किशनलाल याची हत्या आत्मसंरक्षणाच्या अधिकाराखाली असल्याचे मान्य केले, तर दुसरा खून सदोष मनुष्यवधाचे प्रकरण असल्याचे म्हटले. या प्रकरणात सिंघल यास दोषी ठरवले. 

यानंतर सर्वोच्च न्यायालयाने म्हटले : आरोपी या खून प्रकरणात गेल्या साडेतेरा वर्षांपासून शिक्षा भोगतो आहे. ही शिक्षा श्यामसुंदरच्या हत्या प्रकरणात पुरेशी आहे, तर किशनलालच्या हत्येप्रकरणी आत्मसंरक्षणाच्या अधिकाराखाली त्याला निर्दोष मुक्त करण्यात येत आहे. 

खुनांची पार्श्वभूमी : दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना ४ मार्च १९९१ रोजीची आहे. सुरेश सिंघल यास नांगलोई येथील राजेंद्र पार्कमध्ये राहणाऱ्या श्यामसुंदर या इस्टेट एंजटकडून त्याची एक मालमत्ता विकायची होती. दोघांमध्ये काही वाद झाला. त्यांच्यात समेट घडवून आणण्यासाठी एक अन्य इस्टेट एजंट लाला हरिकिशनदास याने त्या दोघांना कार्यालयात बोलावले. तेथे दोन्ही गटात भांडणे झाली. 

या दरम्यान सुरेश सिंघलने त्याच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी चालवून श्यामसुंदर व त्याचा भाऊ किशनलाल या दोघांचा खून केला. खालच्या कोर्टाने सदोष मनुष्यवधाखाली दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.   दिल्ली उच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०१० दरम्यान दिलेल्या निर्णयातही शिक्षा कायम ठेवली होती. या निर्णयास सुरेश सिंघल यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
बातम्या आणखी आहेत...