आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्या. कर्नन यांचा आरोप वेडेपणाचा : जेठमलानी, न्यायमूर्तींवर केलेले आरोप मागे घेण्याचा सल्ला

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- न्यायमूर्ती सी.एस. कर्नन यांनी न्यायमूर्ती, न्यायपालिकेवर लावलेले आरोप हे वेडेपणाचे आहेत. खरे तर त्यांनी हे आरोप मागे घेतले पाहिजेत, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ राम जेठमलानी यांनी केली आहे.

कलकत्ता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कर्नन यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने अवमाननेची कारवाई सुरू केली आहे. न्यायालयात हजर न राहिल्याबद्दल त्यांच्या विरोधात जमानती वॉरंट जारी केले आहे. गेल्या एक वर्षापासून कर्नन विद्यमान व निवृत्त न्यायाधीशांच्या विरोधात सातत्याने आरोप करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जेठमलानी यांनी कर्नन यांना पत्र पाठवले आहे. जेठमलानी पत्रात म्हणाले, बचावासाठी विक्षिप्त असल्याचा आधार घेतला तरी कदाचित त्यांचा वाचण्याचा मार्ग सोपा नाही. तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे, हेच मला खेद पूर्वक नमूद करावेसे वाटते.

तुम्हाला स्वत:चा बचाव करण्यासाठी कदाचित हाच एक मार्ग वाटत असावा. परंतु त्याबाबत आशा बाळगून उपयोग होणार नाही. तुमचे वागणे विक्षिप्तासारखे बनले आहे. ज्येष्ठ वकिल या नात्याने मला तुम्हाला एक सल्ला द्यायचा आहे. तुम्ही जे काही वक्तव्य केले आहे. ते मागे घेण्यात यावे. त्याचबरोबर मूर्खपणाबद्दल क्षमा मागावी, असे जेठमलानी यांनी पत्रात नमूद केले आहे.

समुदायाबद्दल चिंता
मी आयुष्यभर मागास वर्गीयांसाठी काम केले आहे. या समुदायाबद्दल मला चिंता आणि सहानुभूती आहे. म्हणूनच माझ्यासारख्या बुजूर्गाचा सल्ला तुम्ही संवदेनशीलपणे ऐकून घेतला पाहिजे, असे जेठमलानी यांनी आपल्या पत्रातून नमूद केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...