आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केजरीवाल, शिसाेदियांविरुद्ध 23 अाॅगस्टला अाराेपनिश्चिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- बदनामी प्रकरणात दाखल असलेल्या तक्रारीवर दिल्लीच्या न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व उपमुख्यमंत्री मनीष शिसाेदिया यांच्याविरुद्ध २३ अाॅगस्टला अाराेपनिश्चिती केली जाईल, असे स्पष्ट केले. या वेळी अापचे हे दाेन नेते व याेगेंद्र यादव हेदेखील उपस्थित हाेते. याप्रकरणी महानगर न्यायदंडाधिकारी प्रांजल अनेजा हे मंगळवारी अाराेपनिश्चिती करणार हाेते; परंतु ते सुटीवर असल्याने अाता २३ अाॅगस्टला सुनावणी हाेणार अाहे. याप्रकरणी काेर्टाने दाखल तक्रारीनुसार अाप नेत्यांविरुद्ध २ अाॅगस्ट राेजी अाराेपनिश्चिती करण्यास मंजुरी दिली हाेती. तसेच तिकीट नाकारण्यात अालेले अॅड. सुरेंदर शर्मा यांची तक्रार खरी असल्याचे सिद्ध झाल्यास केजरीवाल, शिसाेदिया व यादव या तिघांविरुद्ध अाराेप निश्चित करण्यात येतील, असेही काेर्टाने सांगितले.

याेगेंद्र यादव हे २०१५पर्यंत अाम अादमी पक्षाचे राष्ट्रीय सदस्य हाेते. पक्षविराेधी कारवायांमुळे त्यांना पक्षातून काढण्यात अाले हाेते. त्यानंतर त्यांनी स्वत:चा स्वराज इंडिया नावाचा पक्ष स्थापन केला. अॅड.शर्मा यांच्या तक्रारीनुसार त्यांचे सामाजिक काम पाहून पक्षाकडून त्यांना २०१३मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीसाठी  तिकीट देण्यात येणार हाेते. मात्र, त्यानंतर तिकीट नाकारण्यात अाले, असे अॅड. शर्मा यांनी काेर्टात सांगितले. तसेच १४ अाॅक्टाेबर २०१३ राेजी काही माेठ्या वृत्तपत्रांत अाराेपींकडून छापण्यात अालेल्या अश्लाघ्य शब्दांतील लेखामुळे तक्रारदाराची समाजात बदनामी झाल्याने न्यायालयात तक्रार दाखल करण्यात अाली. या तक्रारीविराेधात अापच्या या २ नेत्यांकडून पक्षाच्या विशेषाधिकारानुसार तिकीट नाकारण्यात आले व काही कारणास्तव याबाबतची माहिती उघड करता येणार नसल्याचे सांगण्यात अाले. काेर्टाने केजरीवाल, शिसाेदिया,यादव यांना सुनावणीला उपस्थित राहण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध कलम ४९९, ५०० व ३४ अन्वये समन्स बजावण्यात अाले हाेते. 

अधिवेशनानंतर हजर राहणार 
दिल्लीत अाजपासून सुरू झालेल्या चारदिवसीय पावसाळी अधिवेशनामुळे न्यायालयात या प्रकरणाच्या सुनावणीला अनुपस्थित राहण्याची सूट मिळावी, अशी मागणी केजरीवाल यांच्याकडून या वेळी करण्यात अाली. 
बातम्या आणखी आहेत...