आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किसान सन्मान रॅलीकडे राज्यातील नेत्यांची पाठ!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदींच्या भूमी अधिग्रहण विधेयकाच्या फासातून शेतकऱ्यांना वाचविल्याबद्दल काँग्रेसने रामलीला मैदानावर रविवारी आयोजित केलेल्या किसान सन्मान रॅलीस इतर राज्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी महाराष्ट्रातील नेत्यांनी मात्र याकडे पाठ फिरवल्याचेच चित्र होते.

संसदेत काँग्रेसने भूसंपादन विधेयकाला कडाडून विरोध केला होता. काँग्रेसला इतर काही पक्षांचीही साथ मिळाल्याने केंद्र सरकारलाही हे विधेयक मागे घ्यावे लागले. लोकसभेत अवघे ४४ खासदार असताना ही लढाई जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी काँग्रेसतर्फे रविवारी रामलीला मैदानावर जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेसाठी महाराष्ट्रातून केवळ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम एवढेच नेते उपस्थित होते. ही सभा केवळ केवळ हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली या राज्यासाठीच असल्याचे जाणवत हाेते. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग इत्यादी दिग्गज नेते उपस्थित असताना महाराष्ट्रातील नेत्यांची अनुपस्थिती जाणवत होती. महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी "दिव्य मराठी'सोबत बोलताना सांगितले की, महाराष्ट्रातील काही प्रमुख नेते उपस्थित होते.

निमंत्रण नव्हते
राज्यात गणपती उत्सव असल्याने नेते मंडळी कमी आली असावी असे सांगून मी स्वत:हूनच या रॅलीमध्ये सहभागी झालो, प्रदेश काँग्रेसकडून निमंत्रण मिळाले नाही, असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, गणेशोत्सव असल्याने मी येऊ शकणार नाही, असे मी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांना कळवले हाेते. ही सभा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने आयोजित केली होती. त्यामुळे प्रदेश काँग्रेसकडून नेत्यांना निमंत्रण पाठवण्याचा प्रश्नच नव्हता. प्रदेश काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमांचे न चुकता
निमंत्रण पाठवू.