आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला राजकारण करता येत नाही, केवळ कविता करू शकतो, पक्षालाही त्याची कल्पना- कुमार विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मला राजकारण करता येत नाही. केवळ कविता करू शकतो. पक्षालाही त्याची कल्पना आहे, अशा शब्दांत आम आदमी पार्टीचे नेते कुमार विश्वास यांनी जाहीर कबुली देऊन टाकली आहे. एक दिवस संसदेत साहिर, फय्याज किंवा एलिया या शायरांना वाचण्याची माझी इच्छा आहे. खरे तर राजकारणात सक्रिय असताना दोन्हीचा समतोल राखणे कठीण होते. 
 
ट्विटमध्ये सकाळी मी काही लिहिले की, सायंकाळी त्याची बातमी होते. अरविंद व माझ्यात मतभेद असल्याचा अर्थ त्यातून काढला जातो, अशा शब्दांत विश्वास यांनी आपल्या भावना मांडल्या. ते रविवारी एका साहित्यविषयक कार्यक्रमात बोलत होते. निवडणुकीबद्दल ते म्हणाले, पंजाबमध्ये आप विजयी होईल. 
 
अनेक तरूण लिहिते झालेत..
एलिया यांचा संदर्भ देत विश्वास म्हणाले, नव्या पिढीत अनेक लोक लिहिते झाले आहेत. त्यांना योग्य व्यासपीठाची गरज आहे. सॉफ्टवेअर इंजिनिअर देखील कविता लिहू लागले आहेत. त्यामुळे मला नवोदित प्रतिभेला वाव मिळावा यासाठी एखादा टीव्ही कार्यक्रम करावासा वाटू लागला आहे, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...