आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंध हा भारताचा भाग नाही याचे दु:ख : अडवाणी यांची खंत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पाकिस्तानमधील सिंध हा प्रांत स्वतंत्र भारताचा भाग नाही याचे दु:ख वाटते, असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी सोमवारी केले.
  
इंडिया फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात अडवाणी बोलत होते. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना उपस्थित होत्या. अडवाणी म्हणाले, ‘भारत अखंड होता, ब्रिटिशांच्या ताब्यात होता तेव्हा सिंध हा भारताचा भाग होता. भारत स्वतंत्र झाला आणि हा भाग विभागला गेला. तो सध्या भारतात नाही याचे मला आणि माझ्या सहकाऱ्यांना वाईट वाटते. बांगलादेशच्या पंतप्रधान सध्या आपल्या देशाच्या दौऱ्यावर आल्या आहेत. त्यामुळे माझ्या दु:खाचा उल्लेख त्यांच्यासमोर करावा, असे मला वाटले.’  
बातम्या आणखी आहेत...