आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे बघ तुझे बाबा होते शूर, तुलाही असंच बनायचंय - आजोबा नातवास म्हणाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- विंग कमांडर राजवीर यादव यांनी तीन दिवसांच्या नातवाला रुग्णालयातून घरी घेऊन आल्यानंतर सर्वप्रथम आपले शहीद पुत्र मेजर ध्रुव यांच्याशी त्याची भेट घडवली. भिंतीवर टांगलेल्या मेजर ध्रुव यांच्या फोटोजवळ त्याला नेत ते म्हणाले, ‘हा फोटो बघ, हे तुझे बाबा आहेत. मोठे बहादूर होते, तुलाही असंच बनायचंय.’

२२ सप्टेंबरला पोखरणमध्ये रणगाड्यांच्या सरावादरम्यान मेजर ध्रुव शहीद झाले. त्यांची पत्नी सुरभी यांनी १५ नोव्हेंबरला मुलाला जन्म दिला. ऑपरेशन थिएटरमधून बाहेर पडताच सुरभी यांनी पहिल्यांदा मुलाला पाहिले अन् म्हणाल्या, हा तर ध्रुवसारखाच दिसतो ना?’ ध्रुव शहीद झाले तेव्हा सुरभी आठ महिन्यांच्या गरोदर होत्या. ध्रुव यांची बहीण नम्रता म्हणाल्या, माझ्या भावाचा अपघाती मृत्यू झालाय, असे जेव्हा लोक म्हणायचे तेव्हा खूप वेदना व्हायच्या. जणूकाही बेदरकारपणे गाडी चालवताना तो गेलाय. लोकांना कळले पाहिजे की माझा भाऊ लाइन ऑफ ड्यूटीवर शहीद झालायं. बाबा व आजोबाही वायुदलात होते. कुटुंबासोबत राहता यावे म्हणून नम्रतांनी मल्टिनॅशनल कंपनीतील नोकरी सोडली. मात्र, ध्रुवसाठी त्यांची तुकडी हेच पहिले कुटुंब होते. यामुळे अंत्यसंस्कारही जैसलमेरमध्ये जवानांच्या गराड्यात झाले. गरोदर सुरभी जैसलमेरला जाऊ शकल्या नाहीत. मात्र, कुटुंब जेव्हा तेथून परतले तेव्हा त्यांनी विचारले, ध्रुव यांना खूप त्रास तर झाला नाही ना? नम्रता सांगतात, सुरभी खूप कणखर आहेत. ध्रुव यांच्या शोकसभेत सुरभी यांनी ध्रुव यांचीच कविता म्हटली. मुलाला रुग्णालयातून घरी आणण्याच्या दिवशीच त्यांच्या लग्नाचा चौथा वाढदिवस होता. ध्रुव यांची आई शालिनी आजही मुलाला पत्र लिहिते. त्या म्हणतात, त्याचा मुलगा जेव्हा मोठा हाेईल तेव्हा ही पत्रं त्याला देईन. कारण, त्याला कळावे की त्याचे बाबा कसे होते.