नवी दिल्ली - बनावट कागदपत्रांवर ६.१८ कोटींचे कर्ज दिल्याप्रकरणी दिल्लीच्या एका न्यायालयाने पंजाब अँड सिंध बँकेच्या माजी मुख्य व्यवस्थापकास तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. ७१ वर्षीय जसविंदर विरसिंह बेदी याच्या एका फर्मला बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयाने दोषी ठरवले आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बेदीसोबतच कर्ज घेणाऱ्या फर्मचे दोन संचालक प्रमोद खुल्लर व विनोद खुल्लर यांनाही तीन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली. सर्व दोषींना तीन- तीन लाख रुपयांचा दंडही ठोठावला.
२००४ मध्ये सीबीआयने या प्रकरणाची चौकशी सुरू केली होती.