आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदवार्ता : हवामान अनुकूल, आंब्याचे विक्रमी उत्पादन होण्याची आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. यात उत्तर आणि दक्षिण भारतातदेखील देशी आणि संकरित आंब्याचे उत्पादन चांगले राहण्याची आशा आहे. यंदाचे वातावरण आंबा उत्पादनासाठी उपयुक्त असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे आंब्याचा आकारदेखील वाढला आहे. या वेळी वादळ-वारा आला नसल्याने पिकाचे नुकसानदेखील झालेले नाही. याव्यतिरिक्त अद्याप कोणत्याच रोगाचा प्रादुर्भाव झाल्याची बातमी नाही. त्यामुळे कीटकनाशकांचा वापरही कमी झाला आहे.

देशात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन उत्तर प्रदेशमध्ये होते. येथील स्थिती गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत सर्वोत्तम असल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या वर्षी हवामान खराब असल्यामुळे सुमारे चार लाख हेक्टर क्षेत्रातील उत्पादनावर ‘एथ्रानोस’ कीड पडली होती. यामुळे उत्पादनावर परिणाम झाला होता. त्याआधीच्या वर्षीदेखील उत्पादन विशेष नव्हते. सध्याचे हवामान आंबा उत्पादनासाठी अनुकूल असल्याचे मत पुसा येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेचे कृषितज्ज्ञ मनीष श्रीवास्तव यांनी व्यक्त केले आहे. सर्वांचा आवडता दशहारा आंबा १० जूनपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची अपेक्षाही त्यांनी वर्तवली. इतर आंब्याच्या जातीदेखील चांगले उत्पादन देण्याची शक्यता आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील आंब्याची झाडेदेखील बहरली आहेत. दक्षिण भारतीय बाजारातील आंबा लवकरच उपलब्ध होण्याची आशा आहे. ओडिशाच्या काही भागांतही आम्रपाली आंब्याची चांगली स्थिती आहे. गेल्या वर्षीदेखील आम्रपाली आंब्याचे चांगले उत्पादन झाले होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, भारत सर्वात मोठा आंबा उत्पादक देश... मलिहाबाद मंडईत विदेशी ग्राहकांच्या संख्येत वाढ