आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मातृत्व योजना लाभ पहिल्या अपत्यासाठीच, पूर्वी पंतप्रधानांनी जाहीर केले होते दोन अपत्यांसाठी लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या मातृत्व लाभ योजनेअंतर्गत आता केवळ पहिल्या अपत्यासाठीच आर्थिक लाभ मिळू शकणार आहे. निधीच्या उपलब्धतेअभावी हा निर्णय घेण्यात आला.
 
संबंधित मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय अर्थसंकल्पात या योजनेसाठी २,७०० कोटी रुपयांचा निधी राखीव ठेवण्यात आला होता. मात्र, हा निधी दोन मुलांसाठी योजनेचे लाभ देण्याइतपत पुरेसा नसल्याने आता केवळ पहिल्या अपत्यासाठीच हे लाभ दिले जाणार आहेत.
 
 सध्या अस्तित्वात असलेल्या इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेचा विस्तार केला जाणार असल्याचे पंतप्रधानांनी ३१ डिसेंबरला जाहीर केले होते. राज्यातील ५६ जिल्ह्यांत पथदर्शक प्रकल्प म्हणून हा प्रकल्प सुरू करण्यात आला होता. या योजनेनुसार, गर्भवती महिलांना ६ हजार रुपये मदत म्हणून दिला जाणार आहे.
 
महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, मातृत्व लाभ देण्यासाठी लागणारा एकूण निधी १२,६६१ कोटी आहे. यात केंद्र सरकारचा वाटा ७,९३२ रुपये होता. मात्र, गेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानंतर प्रत्यक्षात यासाठी केवळ २,७०० कोटी रुपयांचीच तरतूद करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या योजनेचा लाभ आता केवळ पहिल्या अपत्यासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
 
 
बातम्या आणखी आहेत...