आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेटल रिसायकलिंग धोरणानंतर जुन्या कार, फ्रिज विकणे शक्य

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मेटल रिसायकलिंग धोरण ठरल्यानंतर लोक जुन्या कार व फ्रिजसारखी उत्पादने आधीच ठरवून दिलेल्या किमतीवर भंगाराच्या व्यापाऱ्यांना विकू शकतील. नीती आयोग व पोलाद मंत्रालय संयुक्तरीत्या हे धोरण आखत आहे. धातूच्या पुनर्प्रक्रिया धोरणाबाबत नीती आयोग सर्व संबंधितांना भेटले आहे. याला पुढील महिन्यात अंतिम रूप दिले जाईल.
 
नीती आयोगाचे सदस्य विजयकुमार सारस्वत म्हणाले, आपल्याकडे धातू भंगाराच्या रूपात मोठी संपदा आहे. देशाच्या प्रत्येक भागात लोक जुनी कार, फ्रिज, वॉशिंग मशीन विकून किंमत प्राप्त करू शकतील. धोरण आखताना राष्ट्रीय हरित लवादाच्या राष्ट्रीय राजधानीत १५ वर्षांपेक्षा जास्त जुन्या डिझेल व पेट्रोल वाहनांवरील बंदीचा निर्णय तसेच सर्वाेच्च न्यायालयाने देशात एक एप्रिलपासून बीएस-थ्री वाहनांवर घातलेल्या विक्रीच्या बंदीचा विचार करावा लागणार आहे.
बातम्या आणखी आहेत...