आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिनरल वॉटर : हॉटेल, मॉल, विमानतळासह सर्व ठिकाणी एकाच किमतीत मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आता देशाच्या प्रत्येक भागात ग्राहकांना बाटलीबंद पाणी एकाच किमतीत खरेदी करता येऊ शकेल.  देशातील कोणतेही विमानतळ, हॉटेल व मॉलसह सर्व ठिकाणी एकाच किमतीत मिनरल वॉटर विकत घेता येईल, याला केंद्रीय ग्राहक कल्याणमंत्री रामविलास पासवान यांनी दुजोरा दिला आहे. कंपन्या मिनरल वॉटरच्या बाटलीवर वेगवेगळे दर छापत असल्याच्या तक्रारी येत होत्या. कंपन्यांकडून ग्राहक मंत्रालयाने त्याचे उत्तरही मागवले आहे. मात्र आता मिनरल वॉटरचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना मनमानी करता येणार नाही. देशातील कोणत्याही ठिकाणी मिनरल वॉटरची बाटली एकाच किमतीत मिळेल, असे पासवान म्हणाले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...