आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुलभूषण जाधव यांच्या आईला व्हिसा का देत नाही? सुषमा म्हणाल्या- पाक सरकारकडून कानाडोळा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कुलभूषण जाधव यांच्या आईला पाकिस्तानचा व्हिसा देण्यात यावा, अशी विनंती करणारे वैयक्तिक पत्र आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांना पाठवले होते, पण अजीज यांनी ते मिळाले हे कळवण्याची साधी तसदीही घेतली नाही आणि व्हिसा देण्याची सद्भावनाही दाखवली नाही, अशी खंत भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सोमवारी ट्विटरवर व्यक्त केली. मात्र, एखाद्या पाकिस्तानी नागरिकाला भारतात येण्यासाठी वैद्यकीय व्हिसा देण्याची शिफारस अजीज यांनी केली, तर आपण तत्काळ व्हिसा देऊ, असे आश्वासनही स्वराज यांनी दिले.  

सुषमा स्वराज यांनी अनेक ट्विट्स केले. त्यांनी म्हटले आहे की, भारतात उपचारासाठी येऊ इच्छिणारे पाकिस्तानी नागरिक मेडिकल व्हिसाची मागणी करतात. त्यांच्याबद्दल माझ्या मनात सहानुभूती आहे. फक्त त्यासाठी अजीज यांनी शिफारस करावी, एवढीच आमची अपेक्षा आहे.  
कुलभूषण जाधव यांची आई अवंतिका यांना पाकिस्तानमध्ये जाऊन आपल्या मुलाची भेट घ्यायची आहे. त्यासाठी त्यांनी व्हिसासाठी केलेला अर्ज पाकिस्तानकडे प्रलंबित आहे. अवंतिका जाधव यांना पाकिस्तानचा व्हिसा मिळावा, यासाठी मी सरताज अजीज यांना व्यक्तिगत पत्र लिहिले आहे, पण पत्र मिळाल्याची पावती देण्याचे साधे सौजन्यही अजीज यांनी दाखवलेले नाही.  कुलभूषण जाधव (४६) यांना पाकच्या बलुचिस्तान प्रांतात गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. हेरगिरी, दहशतवादी कारवायांत सहभागी असल्याच्या आरोपावरून पाकने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. भारताने या शिक्षेच्या विरोधात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने जाधव यांच्या फाशीला तूर्त स्थगिती दिली आहे.  
 
पुढील स्लाइडवर वाचा, पाकच्या फैजा तनवीरने मागितली होती मदत...
बातम्या आणखी आहेत...