आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लैंगिक अत्याचार प्रकरण : अमानतुल्ला यांची ‘आप’ने केली पाठराखण, राजीनामा फेटाळला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आम आदमी पार्टीने लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात अडकलेले आमदार अमानतुल्ला खान यांची पाठराखण केली आहे. हे प्रकरण कौटुंबिक स्वरूपाचे असून त्याला राजकीय रंग दिला जात असल्याचे आपने म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांचा राजीनामाही फेटाळण्यात आला आहे.

आप नेते तथा उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी हे प्रकरण कौटुंबिक वादाशी संबंधित आहे, असे म्हटले आहे. खरे तर हे प्रकरण एवढे मोठे करण्यामागे मीडिया जबाबदार आहे. कोणतीही खातरजमा न करता बातम्या प्रकाशित केल्या जात आहेत, असे सिसोदिया यांनी म्हटले आहे. आम्ही अमानतुल्ला यांच्या प्रकरणात तथ्य तपासून पाहिले आहे. हा कौटुंबिक वाद आहे. त्यात पडण्याचे कारण नाही. मेहुण्याच्या पत्नीने अमानतुल्ला यांच्यावर अत्याचाराचे आरोप केले आहेत, परंतु खान अनेक दिवसांपासून त्यांच्या संपर्कातही नाहीत. म्हणूनच हे कौटुंबिक प्रकरण आहे. त्याला राजकीय रंग दिला जात आहे.
निवडणूक संपेपर्यंत आप नेत्यांवर खटले
पणजी - आम आदमी पार्टीचे आमदार तसेच नेत्यांवर निवडणूक संपेपर्यंत खटले सुरूच राहणार आहेत. गोवा तसेच पंजाबमधील विधानसभा निवडणूक होईपर्यंत गुन्हे दाखल हाेत राहतील, असे आप नेते सत्येंद्रकुमार जैन यांनी म्हटले आहे. आप नेते अमानतुल्ला खान यांच्यावरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर ते बोलत होते. जैन दोन दिवसांच्या राज्याच्या दौऱ्यावर आले आहेत. िवडणुकीत त्याचा पक्षाच्या कामगिरीवर काहीही परिणाम होणार नाही, असे जैन म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...