आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासाच्या बाबतीत मोदी सरकार जगात अव्वल, 73 % भारतीयांचा भरवसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जनतेचा विश्वास संपादन करण्याच्या बाबतीत मोदी सरकारने अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससारख्या देशातील सरकारला मागे टाकले आहे. ऑर्गनायझेशन फॉर इकोनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंटद्वारा (ओईसीडी) जारी जगभरातीाल विश्वासू सरकारच्या यादीत भारत अव्वलस्थानी आहे. ७३ टक्के भारतीय मोदी सरकारवर भरवसा ठेवतात. तर, ६२ टक्के जनतेच्या विश्वासासह कॅनडा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तुर्की आणि रशिया संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी असून येथील ५८ टक्के जनतेने विद्यमान सरकारप्रति भरवसा व्यक्त केला आहे. हा अहवाल सर्वप्रथमच फोर्ब्जने शुक्रवारी ट्विट केला. 
 
आेईसीडीने गव्हर्नमेंट अॅट अ ग्लान्स-२०१७ नामक हा अहवाल संबंधित देशांच्या लोकप्रशासनाशी संबंधित माहितीच्या अभ्यासातून जारी केला आहे. अहवालानुसार, भारतातील मोदी सरकावर जनतेचा सर्वाधिक भरवसा आहे. तर, अमेरिकेतील फक्त ३० टक्के लोकांनीच ट्रम्प सरकारवर विश्वास व्यक्त केला आहे. ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्या सरकारवर ४१ टक्के, पुतीन सरकारवर ५८ टक्के, जर्मनीच्या मर्केल सरकारवर ५५ टक्के तर जपानच्या शिंजो आबे सरकारवर ३६ टक्के लोकांनी विश्वास दर्शवला आहे. दक्षिण कोरियाचे पंतप्रधान पार्क गुन-हे यांच्यावर महाभियोग सुरू झाल्याने जनतेचा सरकारवरील भरवसा खूप कमी झाला आहे. येथील २५ टक्के जनतेलाच सरकारवर विश्वास आहे. ग्रीसमध्ये तर फक्त १३ टक्के लोकांनीच सरकार विश्वासू असल्याचे म्हटले आहे. 
 
ओईसीडी काय आहे?
ओईसीडी एक स्वतंत्र संस्था आहे. आर्थिक स्तरावर एकमेकांची मदत करणारी जगातील ३४ लोकशाही राष्ट्रे या संस्थेशी निगडित आहेत. शिवाय आर्थिक विकास, समृद्धी आणि चिरंतन विकासासाठी कार्यरत असलेले ७० देशही या संस्थेचे सदस्य आहेत. 
 
जगभरातील लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक स्थितीत सुधारणा व्हावी यासाठी ओईसीडी या सदस्य देशांच्या धोरणांना चालना देण्याचे काम करते.
 
अहवालासाठी निश्चित निकष
 हा अहवाल २०१६ या वर्षातील कामकाजाच्या आधारे बनवला आहे. यात सार्वजनिक क्षेत्रातील रोजगार, सरकारची ध्येय-धोरणे, निधी वितरण, विकास, पारदर्शकता, आरोग्य आणि शैक्षणिक स्तर तसेच न्यायासंदर्भात लोकांची मते, अशा निकषांचा समावेश होता.
 
टॉप - ५ देश
देश   -   लोक
भारत  -  ७३%
कॅनडा  -  ६२%
तुर्की  -  ५८%
रशिया  -  ५८%
जर्मनी  -  ५५%
बातम्या आणखी आहेत...