आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीयांच्या संपत्तीत 6 महिन्यांत 10 % वाढ, मुंबई 28 अब्जाधीशांसह सर्वांत श्रीमंत शहर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतीयांची एकूण मालमत्ता ४१५ लाख कोटी रुपये आहे. सहा महिन्यांत त्यात १० टक्के वाढ झाली. जून २०१६ मध्ये एकूण संपत्ती ३७५ लाख कोटी रुपये होती. देशात २,६४,००० कोट्यधीश व ९५ अब्जाधिश आहेत. 
 
एकूण संपत्तीच्या बाबतीत भारत जगात सहाव्या क्रमांकावर आहे. मालमत्तेचा आढावा घेणारी फर्म “न्यू वर्ल्ड वेल्थ’ने हा अहवाल प्रसिद्ध केला. मालमत्ता डिसेंबर २०१६ पर्यंतची आहे. यात कोट्यधीशचा(मिलेनियर) अर्थ ज्यांच्याकडे कमित कमी एक मिलियन डॉलर म्हणजे ६३७ कोटी रुपयांची संपत्ती आहे. अब्जाधिश(बिलेनियर) म्हणजे ज्यांच्याकडे कमित कमी एक बिलियन डॉलर म्हणजे ६,७०० कोटी रुपये संपत्ती आहे.
 
देशात मुंबई सर्वाधिक श्रीमंत शहर ठरले . या शहराची संपत्ती ५५ लाख कोटी रुपये असून ४६,००० कोट्यधीश तर २८ अब्जाधिश आहेत. दिल्लीची संपत्ती ३० लाख कोटी रुपये आहे. तिथे २३००० कोट्यधीश व १८ अब्जाधिश आहेत. बंगळुरूची संपत्ती २१.५ लाख कोटी रुपये असून ७,७०० कोट्यधीश व ८ अब्जाधिश आहेत. 
 
हैदराबादची एकुण संपत्ती २०.७ लाख काेटी रुपये असून इथे नऊ हजार काेट्यधीश व सहा अब्जाधीश अाहेत. काेलकात्याची संपत्ती १९.५ लाख काेटी रुपये अाहे. इथे नऊ हजार सहाशे काेट्यधीश तर चार अब्जाधिश अाहेत. पुण्याची संपत्ती १२ लाख कोटी रुपये असून ४५०० कोट्यधीश व ५ अब्जाधिश आहेत.
बातम्या आणखी आहेत...