आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई-बडोदा एक्स्प्रेस वेचे काम लवकरच, भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मुंबई-बडोदा या ४०० कि.मी. लांबीच्या एक्स्प्रेस वेचे काम या वर्षी सुरू होईल, मुंबई-पुणे आणि नागपूर-रायपूर महामार्गांवर रस्ते सुरक्षेसंबंधी माहिती देण्यासाठी एफएम रेडिओ सुरू करणार तसेच राज्यात महामार्गांवर पूल उभारणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तथा जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी  यांनी गुरुवारी दिली. 
 
गेल्या अडीच वर्षांत भूपृष्ठ वाहतूक व जहाज बांधणी मंत्रालयाने विविध क्षेत्रांत केलेल्या कामगिरीची माहिती देण्यासाठी परिवहन भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी बोलत होते. या वेळी विभागाचे राज्यमंत्री पी. राधाकृष्णन आणि सचिव संजय मित्रा उपस्थित होते.  

अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी घेणार देवस्थानांची मदत  
राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी शिर्डीचे साईबाबा देवस्थान, शेगावचे गजानन महाराज देवस्थान, मुंबईतील सिध्दीविनायक देवस्थानासह देशातील अन्य देवस्थानांनी रुग्णवाहिका चालवाव्या, असा मंत्रालयाचा विचार आहे. यासंदर्भात संबंधित देवस्थानांना मंत्रालयातर्फे पत्रव्यवहार करण्यात येईल, अशी माहितीही गडकरींनी दिली.  
 
 
बातम्या आणखी आहेत...