आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासाचा रस्ता : गडकरींना हवा अाठ पदरी; सेनेच्या मंत्र्यांचे सहा पदरी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मुंबई ते नागपूर हा सुपर एक्स्प्रेस-वे अाठ पदरी करण्यासाठी भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीत झालेल्या बैठकीतील चर्चेनुसार राज्य सरकारने सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यामार्फत हा प्रस्ताव तेवढ्याच वेगाने गडकरींच्या दरबारी पाठवला. परंतु सहा पदरी मार्गाच्या या प्रस्तावाला गडकरींनी त्याच वेगात तत्काळ ब्रेक लावला. शिंदे यांनी केलेले सादरीकरण पाहिल्यानंतर गडकरी नाराज झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. कोणत्याही परिस्थितीत हा मार्ग आठ पदरीच असला पाहिजे, अशी भूमिका गडकरींनी घेतल्याने हा प्रस्ताव परत मुंबई मुक्कामी आला आहे.

या मार्गाबाबत गडकरी यांच्या काही कल्पना आहेत. त्या तंतोतंत उतरल्याच पाहिजेत अशी त्यांची भूमिका आहे. मात्र, हा मार्ग आठऐवजी सहा पदरी का झाला. हे कोडे सुटण्याआधीच प्रस्ताव परतला आणि आता आठ पदरी मार्गाच्या प्रस्तावावर पुढील आठवड्यात बैठक होत आहे. प्रस्तावात हा बदल का झाला, यात काही राजकारण असू शकते का, की मुद्दाम शिवसेनेने हा बदल केला अशी राजकीय चर्चा मात्र रंगत चालली आहे.

रस्त्याचे दोन पदर गेले कुठे ? नाराजीचा सूर
मराठवाडा- विदर्भाच्या विकासात अडथळे अाणायचे शिवसेनेचे धाेरण असू शकते, असे राजकीय निरीक्षकांना वाटते. गुरुवारी दिल्लीत मुंबई-नागपूर महामार्गाच्या प्रस्तावावरून याला एकप्रकारे पुष्टीच मिळाली. पुणे-मुंबर्इ एक्सप्रेस-वे सारखाच मुंबर्इ- नागपूर अाठ पदरी सुपर एक्सप्रेस-वे तयार करून मराठवाडा, विदर्भाच्या विकासात याेेगदान देण्याबाबत फडणवीस आणि गडकरी यांनी जुलै महिन्यातच निर्णय घेतला हाेता. गडकरी यांच्या निवासस्थानी या दोन्ही नेत्यांची प्रदीर्घ बैठक झाली. त्यात एक्सप्रेस-वे निर्मिती प्रकल्पाबाबत सादरीकरण करण्याचे ठरले. गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाचा अहवाल सादर केला. परंतु जेव्हा गडकरी या प्रकल्पाचे सादरीकरण पहायला लागले तेव्हा त्यांना ताे हा मार्ग अाठ पदरीवरून सहा पदरी करण्यात अाल्याचे लक्षात अाले. हा प्रकार पाहताच गडकरी यांनी नाराजी व्यक्त करीत या एक्सप्रेसवेचे दाेन पदर कुठे गेलेत असा प्रतिप्रश्नही केल्याचे समजते.
शिंदेंना सुनावले
हा प्रस्तावित महामार्ग व्हावा यासाठी मी अाग्रही अाहे. मी या मार्गाला परवानगी देणार अाहेच. मात्र, ताे अाठ पदरीच असायला हवा, असेही गडकरी यांनी शिंदेंना सुनावल्याचे समजते.
सादरीकरणात काय मांडले?
शिंदे यांनी या सादरीकरणात एक्सप्रेस-वेच्या एकूण ८१९ कि.मी. लांब रस्त्याचा मार्ग कसा असेल, राज्याच्या कोणत्या भागातून हा रस्ता जाणार आहे, नागपूर-मुंबई हे अंतर एकूण किती तासांत कापता येईल, एक्सप्रेस वेवर कोणत्या ठिकाणी उड्डाणपूल बांधले जातील, एक्सप्रेस वेच्या आजूबाजूचया परिसर कशा प्रकारे विकसित करण्यात येईल, सुरक्षेची घेण्यात येणारी काळजी, या रस्त्याचा उपयोग करणाऱ्यांना कोण-कोणत्या सुविधा पुरविल्या जातील इत्यादी
बाबी मांडण्यात आल्या. त्यावर चर्चाही झाली. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभागातून हा प्रस्तावित एक्सप्रेस वे जाणार असून राज्याच्या विकासात या रस्त्याचे मोलाचे योगदान राहणार अाहे.