आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रगीताची माहिती जमवा; पीएमओला निर्देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्रीय माहिती आयोगाने पंतप्रधान कार्यालयाला राष्ट्रगान व राष्ट्रगीतासंबंधित माहिती जमा करण्याचे आदेश बजावले. आरटीआयअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न दिल्यामुळे आयोगाने अर्जाची स्वत: दखल घेतली. तुमच्याकडे माहिती नसेल तर ती नव्याने जमा करा, असे निर्देश पीएमओला देण्यात आले आहेत.  

हरिंदर ढिंगरा यांनी पीएमओकडे माहितीच्या अधिकारांंतर्गत राष्ट्रगान, राष्ट्रगीत व अन्य राष्ट्रीय चिन्हांबाबत प्रश्न विचारले होते. मागितलेल्या माहितीचा अर्जदाराशी काहीही संबंध नसल्याचे उत्तर पीएमओने दिले. यावर केंद्रीय माहिती आयुक्त श्रीधर आचार्युलू यांनी केंद्र सरकारकडे जन-गण-मन आणि वंदे मातरम् बाबत कोणते दस्तऐवज आहेत की नाहीत, अशी धारणा होत असल्याचे सांगून माहिती आयुक्तांनी बजावलेल्या आदेशानुसार राष्ट्रगान व राष्ट्रगीताबाबतची माहिती जमा करण्यास सांगितले.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...