आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘फुटकळ इतिहासकार शिवाजींना पळपुटा, अकबरास महान म्हणतात’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाईल फोटो - Divya Marathi
फाईल फोटो
नवी दिल्ली -  फुटकळ इतिहासकार महान महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना पळपुटा तर शत्रू अकबरास महान म्हणतात, असे वादग्रस्त वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महामंत्री कैलाश विजयवर्गीय यांनी केले आहे.

ते म्हणाले, आम्हाला जगाच्या इतिहासातील ती पाने फाडून टाकावी लागतील, ज्यामध्ये महाराणा प्रताप आणि शिवाजी महाराजांना पळपुटे म्हणण्यात आले आहे. देशाचा ध्वज जागतिक गुरू स्थानी कीर्तिमान स्थापित करेल तेव्हा माहात्म्य तेव्हाच सिद्ध होईल. इतिहासकार ज्यांना महान म्हणतात त्यांचे वजन ८० किलोही नव्हते. तर ७.५ फूट उंचीचे महाराणा प्रताप हे ८० किलोचा भाला, छातीवर ७० किलोचे कवच आणि हातात २०० किलो वजनाच्या तलवारीसह अन्य साहित्य घेऊन चालायचे. 
बातम्या आणखी आहेत...