आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नॅशनल हेरॉल्ड प्रकरण :आदेशविरोधी याचिकांना स्वामी यांच्याकडून विरोध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कनिष्ठ न्यायालयाने ११ जानेवारीला वित्त आणि कॉर्पोरेट मंत्रालयाबरोबरच प्राप्तिकर आणि इतर संस्थांकडून कागदपत्रे मागवली होती. हा आदेश रद्द करण्याची मागणी दिल्ली उच्च न्यायालयाकडे करण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपी काँग्रेसचे कोशाध्यक्ष मोतीलाल व्होरा आणि यंग इंडियन कंपनीने हे अपील केले आहे. दुसरीकडे, या प्रकरणी तक्रार दाखल करणारे भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याला विरोध दर्शवला आहे.

स्वामी यांनी उच्च न्यायालयाला सांगितले की, ‘हे कायदेशीर प्रकरण आहे. त्यात याचिकाकर्त्यांना याचिका दाखल करण्याचा अधिकारच नाही. त्याबाबत अनेक निकाल आले आहेत. मी कुठलेही उत्तर दाखल करणार नाही.’ त्यानंतर न्यायालयाने स्वामींना औपचारिक नोटीस जारी केली. युक्तिवादासाठी चार एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. व्होरा आणि यंग इंडियन कंपनीतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ आर. एस. चिमा आणि रेबेका जॉन यांनी बाजू मांडली. चिमा म्हणाले की, स्वामींनी सर्व कागदपत्रे मागवली आहेत. पण त्यांनी आपल्या अर्जात कालावधीचा उल्लेख केला नाही. तरीही कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा अर्ज स्वीकारला होता.
कनिष्ठ न्यायालयाने या प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी, मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस, सुमन दुबे आणि सॅम पित्रोदा यांना जामीन मंजूर केला होता. स्वामींनी या सर्वांच्या विरोधात फसवणूक, कटाचे आरोप लावले आहेत. दरम्यान, जवाहरलाल नेहरू यांनी या वृत्तपत्राची स्थापना केली होती. या प्रकरणात काँग्रेसला मोठा निधी मिळाल्याचा आरोप आहे.
बातम्या आणखी आहेत...