आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेताजींची १९४९ मध्ये होती रेडिओवरून संवादाची इच्छा, या पत्रात केला दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता / नवी दिल्ली - नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी संबंधित ६४ फायली सार्वजनिक झाल्यानंतरही त्यांच्या मृत्यूच्या रहस्यावरील पडदा उठलेला नाही. परंतु ते १९४५ नंतरही जिवंत होते, याचे अनेक स्पष्ट संकेत मिळत आहेत.

गोपनीय कागदपत्रांमध्ये नेताजी यांचे पुतणे अमितय नाथ बोस यांनी त्यांच्या भावाला पाठवलेलया पत्राचाही समावेश आहे. त्यात त्यांनी लिहिले होते की, गेल्या एका महिन्यापासून रेडिओवर एक विचित्र प्रसारण ऐकायला मिळत आहे. त्यात केवळ नेताजी सुभाषचंद्र टा्रन्समीटर.... बोलू इच्छित आहे. तासन्ातास हेच वाक्य ऐकायला मिळत असत. हा आवाज कुठून येत आहे हे आम्हाला माहीत नाही.कारण त्याची घोषणा झाली नाही. अमियने शिशिरला १८ नोव्हेंबर १९४९ रोजी हे पत्र लिहिले होते. ते त्या वेळी लंडनमध्ये राहत होते. दरम्यान बोस यांच्या कुटुंबीयांची स्वातंत्र्यानंतरही हेरगिरी केली गेली. यावरुन हे स्पष्ट होत होते की १९४५ मध्ये नेताजींचा विमान दुर्घटनेत मृत्यू झाला होता या वृत्तावर भारत सरकारचा विश्वास नव्हता.
कागदपत्रे सार्वजनिक करावीत : काँग्रेस
दरम्यान काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी शनिवारी म्हटले की, पश्चिम बंगाल सरकारने सार्वजनिक केलेल्या कागदपत्रांवरून नेताजींची हेरगिरी १९४७ पर्यंत म्हणजे ब्रिटीश सरकार असेपर्यंतच झाल्याचे स्पष्ट हेाते. स्वातंत्र्यानंतरही त्यांची हेरगिरी झाल्याच्या अफवांवर पूर्णविराम लागावा यासाठी सरकारने त्यांच्याशी संबंधित सर्व कागदपत्रे सार्वजनिक करावीत.