आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगा किनाऱ्यावर कचरा केल्यास 1 लाखाचा दंड, एनजीटीची कडक भूमिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नवी दिल्ली - रामगंगेच्या किनाऱ्यावर यापुढे इलेक्ट्रॉनिक कचरा टाकण्याचा प्रयत्न झाल्यास दोषींना १ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. राष्ट्रीय हरित लवादाने ही भूमिका जाहीर केली आहे. त्यामुळे परिसरातील कारखानदारांसाठी हा इशारा मानला जातो.  

न्यायमूर्ती स्वतंत्रकुमार यांच्या अध्यक्षतेखालील एनजीटीने ही कडक भूमिका मांडली आहे. एनजीटीने त्यासाठी एका समितीची स्थापना केली आहे. ही समिती दोन आठवड्यांत आपला अहवाल देणार आहे. त्यात गंगेच्या पात्रातील प्रदूषणाची पातळी किती आहे याचा सविस्तर तपशील दिला जाणार आहे. समितीवर उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळ, मोरादाबादचे जिल्हाधिकारी, पोलिस उपायुक्त, मोरादाबाद स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.  
रामगंगेत आजूबाजूच्या अनेक कारखान्यांतून इलेक्ट्रॉनिक कचरा सोडण्यात येतो. त्यामुळे पात्र प्रदूषित झाले आहे हे आमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संयुक्त पाहणीत ही बाब स्पष्ट झाली आहे. हा कचरा मोठ्या प्रमाणात पात्रात आहे. त्यात धातूचे तुकडे आहेत. त्याचा मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो. त्याचबरोबर पर्यावरणाचीदेखील त्यापासून हानी होते. म्हणूनच हा कचरा दूर करण्याची सर्व प्रकारच्या यंत्रणेची जबाबदारी आहे. त्यापासून या यंत्रणा पळ काढू शकत नाहीत ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, असे एनजीटीने सुनावले आहे.  
 
५९६ किलोमीटरचा विस्तार : रामगंगेचा विस्तार ५९६ किलोमीटरचा आहे. नदीत प्रदूषके वाढली आहेत. त्यामुळे नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. त्यावर केंद्र सरकारने शुद्धीकरणाची मोहीम 
हाती घेतली आहे.
 
‘नर्मदे’ला हानी पोहोचवल्यास दंड: चौहान
नर्मदा नदीची हानी करण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही. दोषींवर कारवाई केली जाईल, असे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी स्पष्ट केले. विधानसभेत बुधवारी यासंबंधीच्या प्रस्तावाला ध्वनिमताद्वारे मंजुरी मिळाली. राज्य सरकारने नर्मदा नदीला सजीव दर्जा दिला आहे. त्यामुळे माणसाला मिळणारे सर्व हक्क नदीला मिळणार आहेत, असे चौहान यांनी स्पष्ट केले. 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...