आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवैध ठिकाणी पार्क वाहनाचा फोटो पाठवा, बक्षीस मिळवा! दंडातून पाठवणाऱ्याला बक्षीस

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अवैध ठिकाणी पार्क केलेल्या वाहनाचे छायाचित्र काढून अधिकाऱ्याला पाठवल्यास बक्षीस दिले जाईल, अशी घोषणा केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी साेमवारी केली आहे. 
गडकरी म्हणाले,  संबंधित वाहन मालकाकडून घेतल्या जाणाऱ्या ५०० रुपये दंडाच्या रकमेतून १०% रक्कम फोटो पाठवणाऱ्याला दिली जाईल. यासाठी मोटार वाहन अधिनियमात तरतूद केली जाईल. मंत्रालयात राजदूत किंवा अन्य मोठी माणसे येत असतात. पार्किंग नसल्यामुळे माझ्या मंत्रालयासमोर लोक वाहने लावतात. त्यामुळे माझ्यावर लाजिरवाणी वेळ येते. शिवाय संसद मार्गावर वाहतूक ठप्पही होते.
बातम्या आणखी आहेत...