आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंसक गोरक्षकांवरून सहा राज्यांना नोटिसा, यात महाराष्ट्रासह 5 राज्ये भाजपशासित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुप्रीम कोर्टाने गोरक्षकांच्या हिंसक घटनांची दखल घेत शुक्रवारी ६ राज्यांना नोटीस बजावली. यात राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड, उत्तर प्रदेश व कर्नाटकचा समावेश आहे. गोरक्षणाच्या नावाखाली हिंसाचार करणाऱ्या या पक्षांवर बंदी का घातली जाऊ नये, अशी विचारणा न्यायालयाने केली. यातील ५ भाजपशासित राज्ये आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे.  
 
न्या. दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील पीठाने सर्व राज्यांना तीन आठवड्यांत उत्तर मागितले. पुढील सुनावणी ३ मे रोजी होईल. या प्रकरणात काँग्रेसचे नेते तहसीन पूनावाला व दोन अन्य व्यक्तींनी याचिका दाखल केली आहे. याचिकाकर्त्यांच्या वकिलाने सांगितले की, राजस्थानच्या अलवरमध्ये गोरक्षकांनी एका व्यक्तीची हत्या केली. या राज्यांमध्ये परिस्थिती खूपच वाईट आह. या प्रकरणात सॉलिसिटर जनरल रंजितकुमार यांनी केंद्राची बाजू मांडत म्हटले की, संबंधित राज्यांना सध्या औपचारिक नोटीस जारी झाली नाही. यानंतर न्यायालयाने नोटीस जारी केली.  
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
बातम्या आणखी आहेत...