आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एनएसडीच्या शाखेबाबत सांस्कृतिक मंत्री उदासीन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- जगप्रसिद्ध नॅशनल स्कूल अाॅफ ड्रामाची (एनएसडी) शाखा महाराष्ट्रात सुरू व्हावी म्हणून या संस्थेचे संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी अथक परिश्रम घेतले. अाघाडी सरकारने त्यासाठी तात्पुरती जागाही ठरवून दिली हाेती. परंतु युतीचे सरकार अाल्यानंतर सांस्कृतिक कार्यमंत्री विनाेद तावडे यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ही प्रख्यात संस्था महाराष्ट्रात अद्याप येऊ शकलेली नाही.

प्रा. वामन केंद्रे हे एनएसडीचे संचालक झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्रात नाट्य महाेत्सव अायाेजित करण्यास प्राधान्य दिले. अांतरराष्ट्रीय नाट्य महाेत्सव त्यांनी अाैरंगाबादेत अायाेजित केला हाेता. अादिवासी नाट्य महाेत्सव मुंबईत हाेत अाहे. एनएसडीची शाखा महाराष्ट्रात सुरू व्हावी म्हणून त्यांनी तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांच्याशी चर्चा केली. चव्हाण यांनी प्रा. केंद्रे यांच्या प्रस्तावावर तातडिने सकारात्मक अभिप्राय देत यासाठीची कार्यवाही करण्यासाठी देवतळे यांना सूचना दिल्या हाेत्या. यादरम्यान विधानसभा निवडणुकीसाठी अाचारसंहिता लागली अाणि हा विषय थांबला. या करारानुसार रवींद्र नाट्य मंदिराच्या चौथ्या मजल्यावर एनएसडीची शाखा नवी वास्तू तयार हाेईपर्यंत सुरू हाेणार हाेती. त्यानंतर फिल्मिसटीमध्ये असलेली साडेचार एकर जागा किंवा मुंबई किंवा पुण्यातील जवळपास ५ ते ६ एकर जागा एनएसडीसाठी उपलब्ध करून देण्यास अाघाडी सरकारने मान्यता दिली हाेती.

राज्यात भाजपप्रणीत नवे सरकार स्थानापन्न झाल्यानंतर एनएसडीकडून अनेकदा पत्रव्यवहार झाला, परंतु त्याची दखल घेतली गेली नाही. याबाबत तावडेंची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, मात्र ते फाेनवर उपलब्ध हाेऊ शकले नाहीत.

प्रा. केंद्रेही अाता साशंक
प्रा. केंद्रे यांनाही सरकारकडून सकारात्मक पावले उचलले जातील याबाबत शंका वाटत अाहे. दिल्लीतील मुख्यालयाशिवाय बंगलाेर आणि सिक्कीम येथे एनएसडीच्या शाखा अाहेत. महाराष्ट्राच्या ताेंडचा घास मंत्र्यांच्या उदासीनतेमुळे जात असल्याच्या वेदना प्रा. वामन केंद्रे यांनी व्यक्त केल्या अाहेत.