आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन लाखांपेक्षा जास्त रोकड घेणाऱ्यांनाही दंड, ऑपरेशन क्लीन मनी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - १ एप्रिल २०१७ पासून ३ लाख रुपयांपेक्षा जास्तीची रोकड स्वीकारणाऱ्या व्यक्तीवरही तेवढाच दंड आकारला जाणार आहे. म्हणजे एखाद्याने ५ लाख रुपयांची रोकड घेतली असेल तर त्यालाही ५ लाख रुपयांचाच दंड लागेल. महसूल सचिव हसमुख अढिया यांनी ही माहिती दिली. अर्थसंकल्पात ३ लाख रुपयांपेक्षा जास्त कॅशच्या व्यवहारावर बंदीचा प्रस्ताव ठेवला आहे. रोख रक्कम स्वीकारणाऱ्यावरही दंड लावला जाईल,असे अढिया यांनी स्पष्ट केले. एखाद्याने रोख पैशातून महागडे घड्याळ खरेदी केल्यास दुकानदारासही दंड लागेल.
नोटबंदीमुळे काळा पैसा रोखला आहे. यापुढे काळा पैसा निर्माण होऊ नये यासाठी सरकारचा प्रयत्न सुरू असल्याचे अढिया यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सर्व मोठ्या रोख व्यवहारावर लक्ष ठेवले जाईल. काळा पैसा बाहेर काढण्याच्या पद्धतीवरही अशीच देखरेख असेल. सर्वसाधारणपणे लोक पर्यटनात, लक्झरी कार, घड्याळ व दागिने खरेदीत रोकड जास्त वापरतात. अर्थसंकल्पातील तरतूद अशा खर्चांना आळा घालेल. दोन लाख रुपयांपेक्षा जास्तीच्या खरेदीवर पॅन क्रमांक सांगण्याचा जुना नियमही सुरूच राहील.आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या अध्यक्षतेखालील समितीने बजेटआधी अंतरिम अहवालात रोख व्यवहाराची मर्यादा निश्चित करण्याची शिफारस केली होती.
 
ऑपरेशन क्लीन मनी
- नोटाबंदीनंतर बँकेत बेहिशेबी रक्कम जमा करणाऱ्यांचा शोध घेण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ‘ऑपरेशन क्लीन मनी’ मोहीम चालवली. याअंतर्गत आतापर्यंत १ कोटीपेक्षा जास्त खातेदारांची चौकशी झाली. पडताळणी केल्यानंतर विभागाने १८ लाख लोकांना पैशाच्या स्रोतासंदर्भात प्रश्न विचारले. संबंधितांच्या अकाउंटमध्ये ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे.
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...