आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंडिगो स्टाफने गैरवर्तन केल्याचा बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूचा आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अॉलिम्पिक पदक विजेत्या पी.व्ही. सिंधूने इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यावर गैरवर्तनाचा आरोप केला आहे. सिंधूसोबत प्रवास करत असलेल्या तिच्या वडिलांनी सांगितले की, हैदराबादहून मुंबईला जाणाऱ्या विमानात किट बॅग व रॅकेट नेण्यापासून राेखले होते.
 
सिंधूने टि्वमध्ये म्हटले की, ‘४ तारखेला हैदराबाद - मुंबई विमान प्रवासाचा अनुभव वाईट राहिला. ग्राउंड स्टाफ अजितेशने गैरवर्तन केले.’ यानंतर इंडिगोने म्हटले, सिंधू निर्धारित वजनापेक्षा जास्त सामग्री घेऊन जात होती. त्यांना सामग्री विमानाच्या कार्गोमध्ये ठेवण्याची सूचना केली. आमचे प्रत्येक प्रवाशाबाबत असेच धोरण आहे.
बातम्या आणखी आहेत...