आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपकडून गुजरातमध्ये धार्मिक कार्डचा वापर सुरू: काँग्रेसचे ज्येष्ठ नेत पी. चिदंबरम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- गुजरातमधील नेते हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवानी यांचा ‘हज’ असा उल्लेख करून भारतीय जनता पक्ष धार्मिक कार्डचा वापर करत आहे, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी सोमवारी केला. पंजाबप्रमाणेच गुजरातमधील युवकही काँग्रेसला स्वीकारतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.


चिदंबरम यांनी अनेक ट्विट्स करून भाजपवर टीका केली. त्यांनी म्हटले आहे की, गुजरातमधील युवकांना रोजगार आणि विकास हवा आहे. पाटीदार आरक्षण आंदोलन समितीचे नेते हार्दिक पटेल, ओबीसी नेते अल्पेश ठाकोर आणि दलित नेते जिग्नेश मेवानी हे युवकांच्या मागण्या मांडत आहेत. त्यांच्या आंदोलनाला क्षुल्लक ठरवू नये. हे तिन्ही नेते गुजरातचे भूमिपुत्र आहेत. त्यांना ‘हज’ असे संबोधणे म्हणजे धार्मिक आणि विभाजनवादी कार्डचा वापर करणे असा होतो.


गुजरातमधील विधानसभा निवडणूक म्हणजे ‘हज’ आणि ‘राम’ (गुजरातचे मुख्यमंत्री विजय) रूपाणी, भाजप अध्यक्ष अमित (शहा) आणि (पंतप्रधान नरेंद्र) मोदी यांच्यातील लढाई आहे, असे पोस्टर सोशल मीडियावर प्रकाशित झाले होते. त्यानंतर चिदंबरम यांची ही प्रतिक्रिया आली आहे. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, गुजरातमधील असंख्य युवक हार्दिक, अल्पेश आणि मेवानी यांच्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी भाजपला स्वीकारले नाही. पंजाबमधील युवकांनी काँग्रेसला स्वीकारले आहे. गोवा आणि मणिपूरमधील युवकांनीही काँग्रेसला स्वीकारले होते. मग आता गुजरातचे युवकही काँग्रेसला का स्वीकारणार नाहीत?, असा प्रश्न चिंबदरम यांनी उपस्थित केला. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यांत निवडणूक होत आहे. ९ आणि १४ डिसेंबरला मतदान होईल. मतमोजणी १८ डिसेंबरला होणार आहे.

 

पुढील स्‍लाइ्ड वर वाचा, काँग्रेसची कट्टरवादाकडे वाटचाल : नितीशकुमार... 

बातम्या आणखी आहेत...