आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅड.उज्ज्वल निकम, ओळवे यांना पद्मश्री, मोदींचे दिवंगत गुरू दयानंद सरस्वतींना पद्मभूषण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरुन डावीकडून- गणपती यादव, उज्ज्वल निकम, सुभाष पाळेकर, सुधाकर ओळवे - Divya Marathi
वरुन डावीकडून- गणपती यादव, उज्ज्वल निकम, सुभाष पाळेकर, सुधाकर ओळवे
नवी दिल्ली- केंद्र सरकारने सोमवारी पद्म सन्मानांची घोषणा केली. दिवंगत उद्योगपती धीरुभाई अंबानी, आर्ट ऑफ लिव्हिंंगचे श्री श्री रविशंकर आणि चित्रपट अभिनेता रजनीकांत यांना पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. एकूण १० दिग्गजांना हा देशाचा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी सन्मान देण्यात आला आहे. पद्मश्री विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सामाजिक कार्यकर्ते सुधाकर ओळवे यांचा समावेश आहे.

सरकारने ११२ पद्म पुरस्कारांची घोषणा केली. त्यात १९ पद्मभूषण, ८३ पद्मश्रींचा समावेश आहे. असहिष्णुतेच्या मुद्द्यावर केंद्र सरकारच्या बाजूने मोर्चे काढणारे अभिनेते अनुपम खेर व कॅगचे माजी प्रमुख विनोद राय हे पद्मभूषण विजेते आहेत. खेर यांना मोर्चात साथ देणारे चित्रपट निर्माते मधुर भांडारकर यांना पद्मश्री मिळाला आहे. पंतप्रधान मोदी यांचे दिवंगत अाध्यात्मिक गुरू दयानंद सरस्वती यांनाही पद्मभूषण दिला आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा, अभिनेता अजय देवगणला पद्मश्री जाहीर झाला.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कुणाला कोणत्या कार्यासाठी देण्यात आला पद्म सन्मान...
-कोण आहेत महाराष्ट्रातील पद्म सन्मान विजेते दिग्गज...
- शरद जोशी यांच्या कुटुंबीयांनी नाकारला पद्म सन्मान...
- पद्म सन्मान प्राप्त मंडळींची सविस्तर यादी...