आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारस्थान: सूडबुद्धीने पाकने जवानांना ठार केले, बाजवांनी दिले होते आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाकिस्तानने आपल्या सैनिकांचा बदला घेण्यासाठी आमच्या सैनिकांविरुद्ध सापळा रचून हल्ला केला आहे. यासाठी पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा यांनी स्वत: आदेश दिले होते. माध्यमांच्या वृत्तांनुसार बाजवा ३० एप्रिल रोजी पाकिस्तानी लष्करी स्थानक हाजी पीर येथे गेले होते. यादरम्यान त्यांनी क्रूर आदेश दिले होते. १७ एप्रिल रोजी भारताने केलेल्या गोळीबारात १० पाक जवान ठार झाले होते. पाकिस्तानला याचाच सूड घ्यायचा होता. पाकिस्तानचे कोअर कमांडर ले. जनरल नदीम रझा यांनी नियंत्रण रेषेवर यामुळे तणाव वाढेल, असा इशाराही दिला होता. रझा पाक सैन्याच्या काश्मीर विभागाचे  प्रमुख आहेत.  

पाककडून पुन्हा शस्त्रसंधीचा भंग :  पाकिस्तानी सैन्याने बुधवारी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर भारतीय स्थानकावर रात्री ३ वाजता गोळीबार सुरू केला. भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिले. कृष्णा घाटी परिसरातदेखील पाकने गोळीबार सुरू केला होता. पाक चमूने भारतीय पेट्रोलिंग पथकावर हल्ला केला होता. भारतीय जवानांच्या मृतदेहांची विटंबनाही केली. 
 
रक्ताचे डाग हाच ठोस पुरावा
भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी जवानांसोबत केलेल्या दुर्व्यवहारप्रकरणी पाकचे राजदूत अब्दुल बासित यांना पाचारण केले. पाक स्थानकाहून दिलेल्या  कव्हर फायरच्या संरक्षणाखाली हल्ला झाल्याचे स्पष्ट आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.भारतीय जवानांच्या रक्ताचे नमुने घेतले आहेत. रोजा नाला येथे रक्ताचे डाग आढळून आले. यावरून हल्लेखोर नियंत्रण रेषा पार करून गेल्याचे स्पष्ट होते. पाक  कमांडर,जवानांवर कारवाईची  मागणी भारताने केली.  
 
आदित्यनाथांशी बोलल्यानंतर शहिदावर अंत्यसंस्कार
देवरिया - देवरियामध्ये सीमा सुरक्षा दलातील शहीद हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. त्यांचा मृतदेह मंगळवारी संध्याकाळी सैन्याच्या हेलिकॉप्टरने घरी आणण्यात आला. येथील  कॅबिनेट मंत्री सूर्यप्रताप शाही यांनी हेलिकॉप्टरमधून रुग्णवाहिकेपर्यंत मृतदेहाला खांदा दिला. शहिदाच्या नातलगांनी मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा आग्रह धरला. त्यानंतरच अंत्यसंस्कार होतील यावर ते ठाम राहिले. रात्री दोन वाजता कॅबिनेट मंत्री सूर्यप्रताप शाही यांनी शहिदाचे वडील बंधू ईश्वर यांच्याशी मुख्यमंत्री योगी  आदित्यनाथ यांचे दूरध्वनीवरून बोलणे करवून दिले. तेव्हा हे नातलग अंत्यसंस्कारासाठी तयार झाले.
 
पुढील स्लाइडवर वाचा, उरी हल्ल्यानंतर बाजवांचे चार दौरे... 
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...