आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता एकाच दिवसात मिळेल पॅन अन् टॅन; नव्या अर्जदारांना इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड देण्यासही सुरुवात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आता तुम्हाला फक्त एका दिवसाच पॅन मिळू शकतो. प्राप्तिकर विभागाने ३१ मार्च २०१७ पर्यंत १९,७०४ नव्या कंपन्यांना एका दिवसातच पॅन दिला आहे. पॅन कार्डसह विभागाने इलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड (ई-पॅन) देण्यासही सुरुवात केली आहे. हे कार्डला अर्जदाराला ई-मेलवर पाठवण्यात येईल. डिजिटली साइन करण्यात आलेल्या ई-पॅनला ओळख पत्राच्या स्वरूपात देता येईल. कर विभागातील सर्वोच्च संस्था सीबीडीटीच्या वतीने एका प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे.  

विभागाने दिलेल्या माहितीनुसार या कंपन्यांना पॅन सोबतच टॅन (टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर) देखील देण्यात आला आहे. यासाठी सीबीडीटीने व्यापार उद्योग मंत्रालयाशी सामंजस्य करार केला आहे. या करारानुसार कंपन्या पॅन आणि टॅनसाठी एकच अर्ज भरू शकतात. या नव्या प्रणालीमुळे अर्ज करणाऱ्यांसाठी ही प्रक्रिया खूपच सुलभ झाली आहे. त्याचबरोबर यासाठी लागणारा वेळदेखील कमी झाला आहे. 
 
ईज-अॉफ-डुइंगवर परिणाम
या पुढाकारामुळे कंपन्यांना व्यवसाय सुरू करण्यासाठी सुलभता येणार असल्याचा दावा सीबीडीटीच्या वतीने करण्यात आला आहे. त्याचबरोबर “ईज-ऑफ डुइंग बिझनेस’मधील भारताच्या क्रमवारीत सुधारणा होईल. ही क्रमवारी जागतिक बँक तयार करते. गेल्या वर्षी २५ ऑक्टोबर रोजी आलेल्या या क्रमवारीत भारताला १९० देशांच्या यादीत १३० व्या क्रमांकावर ठेवण्यात आले होते.

चार तासांत पॅन-टॅन  
प्राप्तिकर विभागाने ३१ मार्चपर्यंत १९,७०४ नवीन कंपन्यांना एकाच दिवसामध्ये पॅन दिला आहे. यामध्ये १०,८९४ कंपन्यांना केवळ चार तासांमध्ये पॅन मिळाला. याचप्रमाणे ९४.७ टक्के अर्जदारांना टॅन चार तासांतच आणि ९९.७३ टक्क्यांना एका दिवसात देण्यात आला आहे.  
बातम्या आणखी आहेत...