आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेक पॅनकार्डवर अनेक खात्यांत व्यवहाराची झडती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीनंतर बँकांमध्ये मोठी रक्कम जमा करणाऱ्यांच्या चौकशीचा दुसरा टप्पा सुरू होणार आहे. ज्यांचे एकापेक्षा जास्त पॅन व बँक खाती आहेत त्यांच्यावर निशाणा साधला जाईल. प्राप्तिकर विभागाच्या जाळ्यात अडकण्यापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी वेगवेगळ्या पॅन कार्डद्वारे वेगवेगळ्या खात्यांत पैसे जमा केले. 
 
डेटा विश्लेषणाच्या माध्यमातून संबंधितांचा शोध घेतला जाईल. या कामासाठी १० दिवसांत दोन कंपन्या नियुक्त केल्या जातील. तोपर्यंत बँकही सरकारला फायनांशियल ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट(एसएफटी)देईल. चौकशी पुढील महिन्यांपासून सुरू होईल.  ५ लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा होणारे खाते चौकशीबाहेर असतील,असे सूत्रांनी सांगितले.
 
‘ऑपरेशन क्लीन मनी’च्या पहिल्या टप्प्यात १८ लाख नागरिकांना एसएमएस व ईमेल पाठवले आहेत. त्यांच्या खात्यात नोटाबंदीनंतर ५ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली होती. जवळपास ७ लाख नागरिकांनी ई-फायलिंग पोर्टलद्वारे पैसा जमा केल्याचे सांगितले मात्र तो काळा पैसा नसल्याचे स्पष्ट केले.
 
साडेचार लाख कोटींवर संशय : नोटाबंदीनंतर दोन लाख रुपयांपेक्षा जास्त जमा रकमेच्या खात्यांत १० लाख कोटी रुपये आले. त्यापैकी ४.५ लाख कोटी रुपयांची रक्कम संशयाच्या भोवऱ्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...