आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO : ‘आप’ मध्ये दुफळीची चिन्हे, अमानतुल्लावरून अ ‘विश्वास’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टीमध्ये दुफळीची चिन्हे दिसू लागली आहेत. पक्षाचे नेते कुमार विश्वास यांनी अचानक बंडखोरीचा पवित्रा घेतला. १५ आमदारांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी नेतृत्वाने कट रचल्याचा आरोप केला आहे. पक्षाचे संस्थापक सदस्य असलेल्या विश्वास यांनी भावूक होताना लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत दिले. 

 मंगळवारी रात्री उशिरा मन वळवण्यासाठी संजय सिंग, आशुतोष त्यांच्या भेटीसाठी गेले होते. त्यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपचा एजंट असल्याचा आरोप आमदार अमानतुल्ला खान यांनी केला होता. त्यावर विश्वास यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. आेखला येथील आमदार अमानतुल्ला खान यांनी राजकीय समिती (पॉलिटिकल अफेयर कमिटी, पॅक)वरून राजीनामा दिल्यानंतर देखील आपमधील वादंग शमू शकलेले नाही. शिवाय पार्टीमधील विविध कलह बाहेर येत आहेत. पार्टीचे नेता कुमार विश्वास यांनी पॅकच्या बैठकीत सहभागी होण्यास स्पष्ट नकार दिला आहे. विश्वास यांनी आपल्या गाझियाबाद येथील निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्यांची नाराजी या वेळी स्पष्ट दिसून आली. अमानतुल्ला खान यांच्यावर कडक कारवाई न झाल्याने ते नाराज असल्याचे या वेळी स्पष्ट दिसून आले. त्यांनी खान यांचा नामोल्लेख टाळत आपली नाराजी जाहीर केली. खान यांना पार्टीतून काढून टाकावे, अशी अपेक्षा कुमार विश्वास यांना होती.  अमानतुल्ला यांनी कुमार विश्वास यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी घनिष्ठ संबंध असल्याचा आरोप केला होता. भाजपचा एजंट असाही विश्वास यांचा उल्लेख खान यांनी केला. हेच उद््गार जर त्यांनी अरविंद केजरीवाल किंवा सिसोदिया यांच्याविरुद्ध काढले असते तर त्वरित पार्टीतून हकालपट्टी झाली असती.  
 
अमानतुल्ला यांचा बोलवता धनी दुसराच : या पत्र परिषदेत कुमार विश्वास भावुक झाले होते. त्यांनी म्हटले की, अमानतुल्लाह केवळ एक मुखवटा असून त्यांचे बोलविते धनी इतर आहेत. ६-७ वर्षांपूर्वी मनीष सिसोदिया आणि अरविंद केजरीवाल यांच्यासह आपण आंदोलनाचे स्वप्न पाहिले होते. मात्र, आपल्याविरुद्ध कट कारस्थाने रचली जात आहेत,असे विश्वास म्हणाले.  
समर्थकांनी घेतली भेट : मंगळवारी सकाळी कुमार विश्वास यांच्या आपमधील निकटवर्तीय आमदारांनी त्यांची घरी जाऊन भेट घेतली. शिवाय अमानतुल्ला खान यांना पार्टीतून काढून टाकण्याची मागणीही त्यांनी केली आहे. पंजाब, गोवा आता महापालिकेच्या निवडणुकीत मात मिळाल्यानंतर आपचे संकट वाढत आहे.
 
विश्वास यांनी टि्वट केलेली कविता.. 
सच के लिए लड़ो मत साथी
भारी पड़ता है;
जीवनभर जो लड़ा अकेला,
बाहर-अंदर का दुख झेला,
पग-पग पर कर्तव्य समर में,
जो प्राणों की बाजी खेला,
ऐसे सनकी कोतवाल को,
चोर डपटता है;
सच के लिए लड़ो मत साथी,
भारी पड़ता है 
 
पुढील स्लाइडवर पाहा, VIDEO...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...