आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वासवर ‘विश्वास’: अमानतुल्ला खान पक्षातून निलंबित, कुमार झाले प्रभारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - दिल्लीतील महापालिका निवडणुकीतील पराभवानंतर आम आदमी पार्टीत अंतर्गत संघर्षाला सुरूवात झाली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार अमानतुल्ला खान यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. त्यानंतर नेते कुमार विश्वास यांनी नरमाईची भूमिका घेतली. त्यामुळे पक्षातील बंड बुधवारी थंडावले. आता पक्षाने त्यांच्यावर राजस्थानच्या प्रभारी पदाची जबाबदारी सोपवली आहे.

पक्षातील वादळ शांत करण्यासाठी बुधवारी सकाळी ११ वाजल्या पासून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी राजकीय प्रकरणांशी संबंधित समितीची (पीएसी) बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक दुपारी दोन वाजेपर्यंत चालली. त्यानंतर उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया व कुमार विश्वास यांनी संयुक्तपणे प्रसार माध्यमांना याबद्दलची माहिती दिली. या दरम्यान विश्वास यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी करताना मिठाईचे वाटप केले. कुमार विश्वास हे भाजपचे एजंट आहेत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यावरून विश्वास यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या नेतृत्वावर शाब्दिक हल्ला केला होता. मंगळवारी त्यांनी जाहीरपणे नाराजी व्यक्त करत ट्विट करून बंडाचे संकेत दिले होते. त्यामुळे पक्षातील दुफळी समोर आली होती.
 
तीन सदस्यीय समितीद्वारे चौकशी : अमानतुल्ला खान यांनी लावलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी ज्येष्ठ नेते पंकज गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. समितीमध्ये पंकज गुप्ता यांच्याशिवाय आप नेता आशुतोष व आतिशी मार्लेना देखील सामील आहेत.
 
हे पण वाचा, 
बातम्या आणखी आहेत...