आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतंजली नूडल्सला परवानाच नाही

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- योगगुरूबाबा रामदेव यांनी नव्यानेच बाजारात आणलेल्या पतंजलीच्या आटा नूडल्सना मान्यता वा परवाना देण्यात आला नसल्याचा खुलासा अन्न सुरक्षा नियामक एफएसएसएआयने केला. पतंजलीने मात्र तो दावा फेटाळून लावला आहे. पतंजलीने नूडल्ससाठी परवानगी घेतलेली नाही, असे एफएसएसएआयचे अध्यक्ष आशिष बहुगुणा म्हणाले. पतंजली आयुर्वेदच्या अन्य उत्पादनांना परवाना आहे. मात्र इन्स्टंट नूडल्सना नाही. पतंजलीने मात्र आमच्याकडे एफएसएसएआयचा केंद्रीय श्रेणीतील पास्ताचा परवाना आहे, तो नूडल्ससाठी चालतो असे स्पष्ट केले.