आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींचे मंत्री म्हणतात, कार- दुचाकीवाले उपाशी मरत नाहीत; पेट्रोल 81 रु. पार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मागील काही दिवसांपासून पेट्रोल- डिझेलच्या वाढत्या दराबाबत शनिवारी केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फोंस कन्नाथनम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. अल्फोन्सा म्हणाले, कार व दुचाकी चालवणारे उपाशी मरत नाहीत. महागडे इंधन खरेदी करण्याची त्यांच्यात कुवत आहे. ते पैसे देऊ शकतात आणि त्यांना तसे करावेच लागेल. पैसे देऊ शकणाऱ्या लोकांवरच आम्ही कर लावत आहोत. पेट्रोलियम उत्पादनांतून मिळणारा पैसा गरिबांच्या कल्याणासाठी गुंतवला जाईल. सरकारने हा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे.

पंतप्रधानांचे गरिबांबाबत मोठे स्वप्न आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. ३० टक्के भारतीय पोटभर जेवण करता झोपतात. अनेकांकडे घर नाही, शौचालय नाही. आज आम्ही पैसा जमा करत असलेली चोरी नाही. दरम्यान, शनिवारी देशात सर्वात महाग पेट्रोल महाराष्ट्रातील परभणीत ८१.३० रुपये व डिझेल अमरावतीत प्रति लीटर ६३.७१ रुपयांनी विकले. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तीन दिवसआधी पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत काहीही करू शकत नसल्याचे म्हटले होते.
 
काँग्रेसवर हल्ला
अल्फोंस यांनी काँग्रेसवर निशाणा साधत म्हटले की, यूपीएच्या कार्यकाळात सरकारला मिळालेला पैसा मंत्र्यांनी खाल्ला, चोरला. 
 
गोमांसावरही वादग्रस्त वक्तव्य 
अल्फोन्सा यांनी ८ सप्टेंबर रोजी विदेशी पर्यटक आपल्या देशात गोमांस खाऊ शकतात,भारतात येण्याआधी त्यांनी गोमांस खाऊन यावे,असे म्हटले होते.
बातम्या आणखी आहेत...