आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंपांवर शुल्क आकारणी, दोन्ही बँकांकडून निर्णय मागे, 3 बँकांनी कार्डवर आकारले होते शुल्क

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहार वाढावेत या दृष्टीने पेट्रोल पंपांवर डेबिट किंवा क्रेडिट कार्डच्या माध्यमातून पेट्रोल खरेदीला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरू असताना काही बँकांनी आपल्या कार्डचा वापर करून होणाऱ्या व्यवहारांवर १ टक्का अार्थिक शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाच्या निषेधार्थ पेट्रोल पंपचालक संघटनेने रविवारी मध्यरात्रीपासून ग्राहकांकडून रोख रक्कमच घेण्याचा इशारा दिल्यानंतर रात्री उशिरा ही शुल्क अाकारणी मागे घेतली जात असल्याचे या बँकांनी जाहीर केले. 

एचडीएफसी व अॅक्सिस बँकेने आपल्या डेबिट व क्रेडिट कार्डने पेट्रोल खरेदी केली तर १ टक्का शुल्क आकारण्याचे जाहीर केले होते. याविरुद्ध पंपमालक संघटनेने पंपांवर ग्राहकांकडून रविवारी मध्यरात्रीपासून फक्त रोख पैसेच घेतले जाणार असल्याचा इशारा दिला होता. यानंतर पेट्रोलियम मंत्रालय व केंद्र सरकारने बँकांना आवाहन केले. त्यानुसार बँकांनी शुल्क आकारणी मागे घेतली. 
बातम्या आणखी आहेत...