आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल-डिझेलचे दर दोन ते अडीच रुपयांनी कमी होणार?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- १५ मार्च रोजी पेट्रोल व डिझेलच्या दरांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत  हे दर २ ते २.५ रुपये कमी केले जाण्याची शक्यता आहे. याआधी १५ जानेवारी रोजी ही आढावा बैठक झाली होती. तेल विपणन कंपन्यांनी व्हॅट वगळता १६ जानेवारीपासून पेट्रोलचे दर ४२ पैसे व डिझेल १.०३ रुपयांनी वाढवले होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाचे दर ५५ डॉलरवरून घटून ५२ डॉलर प्रति पिंपापर्यंत कमी झाले आहेत. अशा स्थितीत येत्या आढावा बैठकीत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...