आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आधीच्या सरकारच्या कार्यकाळात देशातील विमान प्रवासाकडे दुर्लक्ष झाले : मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आधीच्या सरकारच्या कार्यकाळात एव्हिएशन म्हणजेच हवाई वाहतूक क्षेत्रासाठी कोणतेच धोरण नव्हते. आमच्या सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच या क्षेत्रासाठी स्वतंत्र धोरण बनवण्यात आले असून त्यामुळे या क्षेत्राच्या विकासाबरोबरच या क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वाढणार असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. वडोदरा येथील विमानतळाच्या नव्या सुसज्ज इमारतीच्या उद््घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जागतिक पातळीवरील विमानतळ असलेला भारत जगातील तिसरा देश ठरणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशात ८० ते १०० विमानतळ पुरेसे आहेत, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही देशाच्या विकासात अडचणी आणत आहात. या क्षेत्राच्या विकासाबरोबरच रोजगारदेखील वाढणार असून जागतिक पातळीवर भारत या क्षेत्रात स्वतंत्र ठसा उमटवण्यासाठी सज्ज असल्याचे मत मोदी यांनी व्यक्त केले.
देशातील या क्षेत्राच्या विकासाला नवी चालना देण्यासाठी टिअर-टू आणि टिअर-थ्री शहरांवर सरकारच्या वतीने लक्ष केंद्रित करण्यात येत असल्याचे मोदी म्हणाले. या शहरांमध्येदेखील मेट्रो शहरांप्रमाणे क्षमता आहेत. त्यामुळेच सरकारने विभागीय कनेक्टिव्हिटी योजना सादर केली असून त्याचा उपयोग या क्षेत्राच्या विकासासाठी होणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धोरणाशिवाय विकास
मागील सरकारच्या कार्यकाळावर आरोप करत मोदी म्हणाले की, देशात नवीन विमानतळ बनत होते, विमाने उडत होती तरीदेखील देशात कोणत्याही प्रकारचे धोरण नव्हते. तुमच्याकडे व्हिजन असेल तर आपण पाच ते दहा वर्षांत या क्षेत्राला विकासाच्या दिशेने नेऊ शकतो. तसेच प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा देण्याकडेही लक्ष देता येईल, असेही त्यांनी सांगितले.

आमचे धोरण प्रवाशांसाठी
प्रवाशांच्या गरजांबरोबरच या क्षेत्राच्या विकासासाठी आमचे सरकार आल्यानंतर योग्य धोरण तयार करण्यात आले असल्याचे मोदी यांनी सांगितले. त्यामुळे सध्या या क्षेत्राचा तेजीने विकास होत असून जास्तीत जास्त सर्वसामान्य व्यक्तीदेखील विमान प्रवास करत असल्याचे ते म्हणाले. पुढील काळातही विमान प्रवास करणाऱ्या व्यक्तींची संख्या वाढणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भारत तिसऱ्या स्थानी
पुढील काही वर्षांत जागतिक पातळीवर विमान प्रवास करणाऱ्या एकूण प्रवाशांचा विचार केल्यास भारताचा जगात तिसरा क्रमांक लागेल. यावरून या क्षेत्राचा विकास कोणत्या गतीने होत आहे याचा अंदाज येत असल्याचे मोदी म्हणाले. यामुळेच या क्षेत्रात रोजगाराच्या अनेक संधी असून त्याचा अर्थव्यवस्थेलाही फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...