आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उडानच्या आराखड्यात सरकार करेल सुधारणा; सिमला-दिल्लीच्या विमानसेवेतून योजनेचा शुभारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशांतर्गत विमान सेवेच्या वाढीसाठी सुरू झालेल्या उडान योजनेच्या आराखड्यात सुधारणा करण्याच्या विचारात सरकार आहे. सिमला ते दिल्लीच्या विमानसेवेतून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यानंतर सरकारी स्तरावर योजना आराखड्याचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.
 
यामध्ये विमानातील आसन संख्या आणि एअरलाइन्साठीच्या विशिष्ट अवधीवर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे. मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी उडान योजनेत विमान संपर्क क्षेत्र वाढवणे व नागरिकांना माफक दरात विमानप्रवास उपलब्ध करून देणे हा मुख्य उद्देश आहे.
बातम्या आणखी आहेत...