आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारनेच सांगावे, कोणत्या पोर्न साइट ब्लॉक करायच्या!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पोर्नोग्राफी वेबसाइट ब्लॉक करण्यावरून आता दूरसंचालय मंत्रालय आणि इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांमध्ये जुंपली आहे. ८५७ पोर्न साइट्स बंद केल्यावरून सरकारवर टीका झाल्यानंतर पवित्रा बदलून फक्त चाइल्ड पोर्नोग्राफी साइट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसे निर्देशही इंटरनेट सेवा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना (आयएसपी) देण्यात आले. मात्र नेमके हे वर्गीकरण करायचे कसे, हा प्रश्न कंपन्यांना पडला आहे.

आयएसपीच्या मते, केवळ चाइल्ड पोर्नोग्राफी साइट बंद करणे योग्य ठरणार नाही. यात पोर्नोग्राफी साइटचे वर्गीकरण करायचे कसे हा आयएसपीसमोर खरा प्रश्न आहे. कोणती फिल्म चाइल्ड पोर्नोग्राफी मानायची हे ठरवणे यात कठीण जात आहे. सरकारने ८५७ साइटपैकी चाइल्ड पोर्नोग्राफी ठरणाऱ्या काही साइट्सची नावे यएसपीला कळवली आहेत. आता नियामक मंडळाने ठरवायचे आहे की नेमक्या कोणत्या साइट बंद करायच्या.

आम्ही ठरवायचे कसे : आयएसपी : आयएसपी असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष राजेश चारिया यांनी म्हटले आहे की, वेबसाइट ब्लॉक करण्याचा अधिकार माहिती-तंत्रज्ञान मंत्रालयास आहे.