आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच राज्यांच्या विधानसभा निकाल: एक्झिट पोलचे संभाव्य निकाल विरोधकांना अमान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पाच राज्यांच्या विधानसभा निकालांबाबत एक्झिट पोलचे संभाव्य अंदाज गुरुवारी सायंकाळी वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर दिल्लीचे राजकीय तपमान वाढले आहे. विराेधकांना पंजाब वगळता कुठलेही अंदाज मान्य नाहीत.  संसद परिसरातही चर्चेचा केंद्रबिंदू शुक्रवारी त्यावरच होता.

शनिवारच्या  ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले अाहे. मात्र, विरोधकांना हे  एक्झिट पोलचे संभाव्य निकाल मान्य नाहीत. ११ तारीख उजाडू द्या, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना समाजवादी पक्षाचे नेते रामगोपाल यादव म्हणाले, ‘आम्ही १00 टक्के जिंकतो आहोत. आमची पक्की माहिती आहे की एक्झिट पोलच्या आकडेवारीत बदल करण्यासाठी वाहिन्यांवर भरपूर दबाव आणला गेला अाहे.’  राहुल गांधी म्हणाले, ‘बिहार निवडणुकीच्या निकालांपूर्वीही असेच एक्झिट पोल जाहीर झाले होते. निकालानंतर त्यातला फोलपणा दिसून अाला. उत्तर प्रदेशात काँग्रेस अाणि समाजवादी पक्षाचे सरकार सत्तेवर येईल. याबाबत उद्याच बाेलू.’ खासदार नरेश अग्रवाल म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस आघाडीलाच हमखास बहुमत मिळणार आहे. संभाव्य निकालांमधे आम्हाला कमी लेखण्याचे षड््यंत्र नेमके कोणी रचले, याचा खुलासा ११ मार्चच्या निकालानंतर आम्ही जरूर करू.’ मुलायमसिंग म्हणाले, ‘कोणत्याही पोलवर विश्वास ठेवू नका. मला खात्री आहे की उत्तर प्रदेशात सप आणि काँग्रेस आघाडीलाच बहुमत मिळेल आणि अखिलेश यादवच मुख्यमंत्री होतील.’
 
‘मायावतींवर कोणी हल्ला केला होता?’
भाजपची मुलूखमैदानी ताेफ खासदार योगी आदित्यनाथ म्हणाले, ‘उत्तर प्रदेशात कोणत्याही आघाडीची गरज नाही. राज्यातल्या सर्व वर्गांची मते आम्हाला मिळाली आहेत. भाजपच्या हाती पूर्ण बहुमताचे सरकार सोपवण्याचा निर्णय राज्यातल्या जनतेने घेतला आहे. बसपशी तडजोड करण्याआधी सर्वप्रथम लखनऊच्या गेस्ट हाऊसवर मायावतींच्या अब्रूवर १९९५ साली क्रूर हल्ला कोणी चढवला, त्याचे उत्तर अखिलेश यादव यांनी दिले पाहिजे.’
 
बातम्या आणखी आहेत...