आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता 1,600 चौ. फुटांच्या घरासाठी व्याजात 3 टक्के सूट, 80 टक्के लोकांना लाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- हक्काच्या घराचे स्वप्न बाळगणाऱ्यांना दिलासा देताना सरकारने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (शहरी) मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी (एमआयजी) कार्पेट एरिया ३२३ वरून ४३० चौ. फुटांपर्यंत वाढवून १,६१४ चौ. फूट केला. यामुळे वाजवी किमतीत घरांच्या योजनेत मोठी घरेही मिळू शकतील. याचा लाभ सुमारे ८०% ग्राहकांना होईल. ही योजना १ जानेवारी २०१७ रोजी सुरू झाली होती. पूर्वलक्षी प्रभावाने हा बदल लागू होईल. 

 

गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. योजनेत एमआयजी-१साठी ९ लाखापर्यंतच्या होम लोनवर व्याजात ४% व एमआयजी-२साठी १२ लाखापर्यंतच्या कर्जावर व्याजात ३% सूट मिळेल. या सवलतीमुळे २० वर्षांच्या कर्जावर २.६७ लाख रुपये व्याज वाचेल. गृहकर्ज यापेक्षा अधिक असेल तर जास्तीच्या रकमेवर ही सूट मिळत नाही. उदा. एमआयजी-१ श्रेणीत २० लाख कर्ज असेल तर ९ लाखापर्यंतच व्याजात ४% सूट मिळेल. उर्वरित ११ लाखावर बँकेच्या प्रचलित दराने व्याज लागू असेल. 

 

> २० वर्षांच्या होम लोनवर २.६७ लाखांची होईल बचत

 

एमआयजी-१ : कार्पेट एरिया ९६८ वरून १२९१ चौरस फूट

 

- पूर्वी : ९० चौ. मीटर म्हणजे ९६८ चौ. फूट कार्पेट एरिया असलेल्या घरांसाठीच व्याजात सूट होती.
- आता : १२० चौ. मीटर म्हणजे १,२९१ चौ. फुटांपर्यंत कार्पेट एरियाच्या घरासाठी व्याजात सूट मिळेल.

- सूट : ग्राहकाचे वार्षिक उत्पन्न ६ ते १२ लाख असेल तर ९ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजदरात ४% सूट. 

 

एमआयजी-२ : कार्पेट एरिया ११८४ वरून १६१४ चौरस फूट.

- पूर्वी : ११० चौ. मीटर म्हणजे १,१८४ चौ. फुटांपर्यंत कार्पेट एरियाच्या घरांसाठी व्याजात सूट होती. 
- आता : १५० चौ. मीटर म्हणजे १,६१४ चौ. फुटांपर्यंत कार्पेट एरियाच्या घरांसाठी व्याजात सूट मिळेल.

- सूट : ग्राहकाचे वार्षिक उत्पन्न १२ ते १८ लाख असेल तर १२ लाखांपर्यंतच्या कर्जावर व्याजात ३% सूट.

 

> (एमआयजी-१ मध्ये ९ लाखांहून अधिक  आणि एमआयजी-२मध्ये १२ लाखांहून अधिक कर्जावर पूर्ण व्याज द्यावे लागेल.)

बातम्या आणखी आहेत...